अॅडफॅक्टर्स पीआरने जिंकली PRPL 2023
मुंबई – भारतातील सर्वात मोठ्या पीआर कन्सलटन्सीचा क्रिकेट संघ अॅडफॅक्टर्स युनायटेड पब्लिक रिलेशन्स प्रीमियर क्रिकेट लीग २०२३ (पीआरपीसीएल), पश्चिम आवृत्तीचा विजेता ठरला आहे. पब्लिक रिलेशन्स कन्सलटंट्स असोसिएशन ऑफ इंडियाने (पीआरसीएआय) ११ मार्च २०२३ रोजी खार जिमखाना, मुंबई येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते.
स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अॅडफॅक्टर्स युनायटेडने केवळ सहा षटकांत १३१ धावा करत पीआरपीसीएलमध्ये नवा इतिहास रचला. संघाने +४.७७ च्या सकारात्मक रनरेटसह अंतिम फेरीत प्रवेश केला आणि +२ च्या फरकासह संपूर्ण स्पर्धेत सर्वोच्च नेट रन रेट कायम ठेवला.
एकूण २३८ धावा करणारे सातवीर खैरालिया यांना मालिकेचे मानकरी म्हणून घोषित करण्यात आले तसेच त्यांना दोनदा सामनावीराचा मानही मिळाला. सुशील म्हाडगुट यांनीही सामनावीराचा सन्मान मिळवला, तर कार्तिक बंगेला यांना उपांत्य फेरीत सामन्यातील लढवय्याचा पुरस्कार मिळाला.
या विजयाविषयी अॅडफॅक्टर्स पीआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजय एन. नायर म्हणाले, ‘क्रीडासंस्कृती अॅडफॅक्टर्स पीआरच्या नसानसात भिनलेली आहे. आमचे अंतर्गत विकास उपक्रम असो किंवा या क्षेत्रातील सर्व स्पर्धांमधले प्रतिनिधीत्व असो, आम्ही खिलाडूवृत्तीचा कायम पुरस्कार करतो. ही स्पर्धा जिंकल्याने आम्ही अभिमान व आनंदाने भारावून गेलो आहोत. लोकांनी कामाप्रमाणेच खेळाचाही तितकीच मेहनत, प्रेम आणि चिकाटीने आयुष्यात समावेश करावा म्हणून आम्ही यापुढेही पाठिंबा देत राहू.’
याविषयी आपला आनंद व्यक्त करत अॅडफॅक्टर्स युनायटेडचे कर्णधार ओंकार जळगावकर म्हणाले, ‘अॅडफॅक्टर्स पीआर आणि आमच्या सर्वांसाठी पीआरपीसीएल ट्रॉफी जिंकणे हा अभिमानाचा क्षण आहे. संघाने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि म्हणूनच हा विजय सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला आहे.’
सर्वांसाठी पीआरपीसीएल ही उत्सुकता वाढवणारी स्पर्धा असते, कारण त्यात भारताच्या पश्चिम विभागातील सर्वोत्तम पीआर कंपन्या सहभागी होत क्रिकेटचे कौशल्य दाखवतात. अॅडफॅक्टर्स युनायटेडचा विजय हे त्यांची संघभावना, अथक प्रयत्न आणि क्रिकेटचा ध्यास यांचे प्रतीक आहे. टीमने आतापासूनच पुढच्या वर्षीही ही स्पर्धा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.