fbpx

श्री शिवाजी मराठा आर्किटेक्चर क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा सोमवारपासून

पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या वतीने आंतर महाविद्यालयीन ‘श्री शिवाजी मराठा आर्किटेक्चर क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक १३ ते १६ मार्च दरम्यान महाविद्यालयाच्या अरण्येश्वर कॅम्पस मधील क्रिकेट मैदानात ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत कटारीया आणि संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि पुण्यातील ४ स्वायत्त विद्यापीठातील आर्किटेक्चर महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. विविध महाविद्यालयातील २० संघानी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.

स्पर्धेत बाद पद्धतीने सामने होणार असून १० षटकांचे सामने असतील. रोख पारितोषिके आणि विजेत्यांना आकर्षक चषक देण्यात येणार आहे. सामनावीर आणि सर्वोत्तम गोलंदाज अशी वैयक्तीक पारितोषिकेही खेळाडूंना दिली जाणार आहेत. मुलींचे सामने देखील स्पर्धेत होतील. स्पर्धेचे उद्घाटन सोमवार दिनांक १३ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता तर समारोप १६ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: