fbpx

आयओसी – ए संघ ठरला ३२ व्या पीएसपीबी इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

पुणे : इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) – ए  संघाने ३२ व्या पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी) इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेत ऑईल अँड नॅचरल गॅस ( ओएनजीसी)- ए या संघावर २.५-१.५ गुणांनी मात करत, स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल)च्या वतीने पीवायसी हिंदू जिमखाना येथे आयोजित ३२ व्या पीएसपीबी इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीला आयकर विभागाचे मुख्य आयुक्त डॉ. दीपक रिपोते यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली होती.

स्पर्धेत अंतिम फेरीत बीपीसीएल संघाने ओएनजीसी बी संघावर ३.५ – ०.५ असा जबरदस्त विजय मिळवत तिसरे स्थान पटकावले.

अंतिम फेरीतील महत्त्वाच्या लढतीत, आयओसी – ए  संघाचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने ओएनजीसी – ए संघाचा ग्रँडमास्टर विदित गुजराथी याचा पराभव करत, महत्वपूर्ण विजय मिळविला.  या एकमेव विजयामुळे संघाने विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.

दुसऱ्या बोर्डवर, आयओसी – ए संघाचा ग्रँडमास्टर मुरली कार्तिकेयन आणि ओएनजीसी – ए संघाचा ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी यांच्यात क्वीन-पॅन ओपनिंगमध्ये बरोबरीची लढत झाली. तिसऱ्या बोर्डवर, आयओसी – ए संघाचा ग्रँडमास्टर रौनक साधवानीने ओएनजीसी-ए संघच्या ग्रँडमास्टर मित्रभा गुहा यांच्यासोबतचा सामना बरोबरीत राखला. तर चौथ्या बोर्डवर, आयओसी – ए संघाचा ग्रँडमास्टर अधिबान बी याने क्वीन्स इंडियन डिफेन्स तंत्रामध्ये ओएनजीसी-ए संघाचा ग्रँडमास्टर सेथुरामन एसपी यांच्यासोबत बरोबरी साधली.

स्पर्धेत शुक्रवारी सकाळच्या सत्रात संपन्न झालेल्या उपांत्य फेरीदरम्यान ओएनजीसी ए व ओएनजीसी बी संघात झालेल्या लढतीमध्ये संघाने ओएनजीसी ए ओएनजीसी बी संघावर ३-१ अशी मात केली. तर आयओसी-ए  संघाने बीपीसीएल संघावर २.५-१.५ अशी मात केली. माजी क्रिकेटपटू विनायक द्रविड यांच्या उपस्थितीत या फेरीस सुरूवात झाली होती.

ओएनजीसी ए  आणि ओएनजीसी बी संघामध्ये झालेल्या लढतीत ओएनजीसी ए  संघाच्या ग्रँडमास्टर विदित गुजराथी वि. ओएनजीसी बी संघाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर व्ही एस राहुल आणि महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ईशा शर्मा आणि ग्रँडमास्टर मित्रभा गुहा यांच्यामध्ये बरोबरीचा सामना झाला. मात्र, तिसर्‍या आणि चौथ्या बोर्डमध्ये, ग्रँडमास्टर एस पी सेथुरामन आणि दीप सेनगुप्ता (दोन्ही ओएनजीसी-ए संघाचे खेळाडू) यांनी अनुक्रमे ग्रँडमास्टर नीलोत्पल दास आणि आंतरराष्ट्रीय मास्टर पी कोंगुवेल (ओएनजीसी-बी संघाचे खेळाडू) यांच्यावर मात केली.

आयओसी-ए  आणि बीपीसीएल या संघांमध्ये झालेल्या उपांत्य फेरी सामन्यात टॉप बोर्डवर, बीपीसीएल संघाचा ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ता याने गतिमान खेळी करत, किंग्स इंडियन डिफेन्समध्ये आयओसी-ए  संघाचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंधावर यांच्यावर मात केली.  दुसऱ्या बोर्डवर, आयओसी-ए  संघांचा ग्रँडमास्टर मुरली कार्तिकेयन याने क्वीन एंडिंगमध्ये  तंत्रात बीपीसीएल संघाचा ग्रँडमास्टर एम आर वेंकटेश विरुद्ध बरोबरी साधली.

तिसऱ्या बोर्डावर, आयओसी-ए  संघाचा ग्रँडमास्टर रौनक साधवानी याने बीपीसीएल संघाचा ग्रँडमास्टर वैभव सुरीविरुद्ध गोल केला.

चौथ्या बोर्डावर, आयओसी-ए  संघाचा ग्रँडमास्टर बी अधिबानने फ्रेंच बचावाचा वापर करत, बीपीसीएल संघाचा ग्रँडमास्टर जी एन गोपालला रणनीतिकदृष्ट्या मागे टाकले, ज्यामुळे या संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यात मदत झाली.

निकाल :

अंतिम फेरी:

– आयओसी – ए संघाने ओएनजीसी – ए संघावर २.५ – १.५ गुणांनी मात केली.

-ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंध यांनी ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांचा (१-०) ने पराभव केला.

ग्रँडमास्टर मुरली कार्तिकेयन वि. ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी (१/२ – १/२) यांच्यात बरोबरीचा सामना

ग्रँडमास्टर रौनक साधवानी वि. ग्रँडमास्टर मित्रभा गुहा (१/२ – १/२) यांच्यात बरोबरीचा सामना

ग्रँडमास्टर अधिबान बी वि. ग्रँडमास्टर सेतुरामन एस पी (१/२ – १/२) यांच्यात बरोबरीचा सामना

उपांत्य फेरी – १:

– ओएनजीसी – ए वि. ओएनजीसी – बी सामन्यात ओएनजीसी – ए संघ ३-१ गुणांनी विजयी

– ग्रँडमास्टर विदित गुजराती वि. आंतरराष्ट्रीय मास्टर व्ही एस राहुल यांच्यात ( १/२-१/२) बरोबरीचा सामना

– ग्रँडमास्टर मित्रभा गुहा आणि महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ईशा शर्मा यांच्यात (१/२-१/२) बरोबरीचा सामना

– ग्रँडमास्टर एस पी सेतुरामन (ओएनजीसी-ए) यांनी ग्रँडमास्टर नीलोत्पल दास (ओएनजीबी-बी) यांचा १-० गुणांनी पराभव केला.

– ग्रँडमास्टर दीप सेनगुप्ता (ओएनजीसी-ए) ने आंतरराष्ट्रीय मास्टर पी कोंजुवेल यांचा  १-० गुणांनी पराभव केला.

उपांत्य फेरी – २ :
– आयओसी-ए  संघाची बीपीसीएल संघावर २.५ – १.५ गुणांनी मात

– ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ता यांच्याकडून  ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंध यांचा ०-१ ने पराभूत

– ग्रँडमास्टर मुरली कार्तिकेयन आणि ग्रँडमास्टर एम आर  वेंकटेश यांच्यात बरोबरीचा सामना ( १/२ – १/२)

– ग्रँडमास्टर रौनक साधवानी  यांनी ग्रँडमास्टर वैभव सुरी यांना १-० गुणांनी पराभूत केले.

– ग्रँडमास्टर बी अधिबान यांनी ग्रँडमास्टर जी एन गोपाल यांना १-० गुणांनी पराभूत केले.

Leave a Reply

%d bloggers like this: