fbpx

आज भरती आहे… उद्या ओहोटी येणार हे भाजपने लक्षात ठेवावं – राज ठाकरे

ठाणे  : प्रत्येक राजकीय पक्षाच्या इतिहासात भरती-ओहोटी आलेली आहे, ६५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसची आजची अवस्था काय आहे? त्यामुळे आज भरती आहे… उद्या ओहोटी येणार हे भाजपने लक्षात ठेवावं, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी दिला आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७ व्यय  वर्धापनदिन  निमित्त ठाण्याच्या गडकरी रंगायथनमध्ये मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे बोलत होते. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ”त्यादिवशी घटना घडल्यानंतर मी काही बोललो नाही. मला अनेकांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं? कोणी केलं असेल. एक निश्चित सांगतो, ज्याने हल्ला केला त्याला आधी कळेल आणि मग सगळ्यांना कळेल. आमच्या मुलांचं रक्त असं वाया जाऊ देणार नाही. ते राज्यासाठी काम करायला आले आहेत.”

एक ही है मगर काफी हैं, असा शोले चित्रपटातील संवाद बोलत राज ठाकरे म्हणाले, राजू पाटील हे पक्षाची बाजू विधानसभेत एकटेच मांडत आहेत. विधानसभा भरली तर काय होईल यांचं. ते म्हणाले, ”काही पक्षांना बांधलेले पत्रकार दुसऱ्या पक्षांबाबत गैरसमज पसरवतात. हे पत्रकार आम्हाला जे प्रश्न विचारतात ते इतर पक्षांना विचारणार नाहीत. ते लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात.”

दरम्यान, दादर येथील शिवतीर्थावर राज ठाकरे यांची २२ मार्च रोजी सभा आहे. या सभेत कोणाचे वाभाडे काढायचे, कोणावर काय बोलायचं हे, हे सगळं मी त्या सभेत बोलणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. मनसेच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्या विभागात काय काम केलं, कोणती आंदोलनं केली आणि पक्षानं केलेली कार्य यावर डिजिटल पुस्तिका देखील आज राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: