fbpx

मराठमोळ्या वेशात रमिला लटपटे तरुणीचा जगभ्रमंतीचा प्रवास सुरु

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया भाषणाने प्रेरित होऊन जगभरात भारताची डेव्हलप इंडिया व्हिजनची छबी पसरविण्यासाठी मोटरसायकलने जगभ्रमंतीचा मानस केला असून महिला दिनाचे औचित्य साधत आज त्याची सुरुवात करित आहे. असे प्रतिपादन भारत की बेटीच्या नावाने ओळखली जाणारी रमाबाई म्हणजेच रमिला लटपटे ने केले आहे. आज जगभ्रमंतीच्या फ्लॅग ऑफ प्रसंगी ती बोलत होती.

भारत देशात प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत आता मराठमोळ्या वेशात नऊवारी साडी नेसून तरुणी रमिला लटपटे मोटरसायकल वरून जगभ्रमंतीचा प्रवास करून एक नवीन इतिहास रचणार आहे. त्याची सुरुवात आज 9 मार्च रोजी गेट-वे-ऑफ पासून झाली असून सुमारे 365 दिवसात प्रवास करून 8 मार्च 2024 रोजी पुन्हा भारतात परतणार आहे. याप्रसंगी अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , प्रसाद नगरकर, सुरेश भोईर आदी उपस्थित होते.

जगभ्रमंती मध्ये 12 खंड, 20 ते 30 देशातून प्रवास करित सुमारे एक लाख किलोमीटर्सचा प्रवास पुर्ण करणार आहे. फक्त प्रवास नाही करणार तर महाराष्ट्रातील विविध बचत गटाच्यामाध्यमातून बनविण्यात आलेले विविध साहित्य, पदार्थ आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करीत भारत व महाराष्ट्राची संस्कृती प्रत्येक देशा पर्यंत पोहोचविण्याचा मानस भारताची मुलगी रमिला लटपटेचा आहे.
रमा (रायजींग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेचे नियोजन केले आहे. यापुर्वी रमाबाई ने भारतातील अनेक ठिकाणी मोटरसायकलने प्रवास केला आहे, त्यामुळेच जगभ्रमंतीचा ध्येय जोपासले आहे.

रमिला लटपटे या चिंचवड (पुणे) येथील निवासी आहेत. त्या अहिल्या फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेसाठी महिला व तरुणांच्या सक्षमीकरणाचे उपक्रम राबवतात. 

Leave a Reply

%d bloggers like this: