Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

नागराज मंजुळेचा मुलगा दिसणार ‘घर बंदूक बिरयानी’ मध्ये

लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule)  यांचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘पिस्तुल्या’ या लघूपटापासून सुरू झालेला संघर्षमय प्रवास आपण सर्वांनी पाहिलाय. फॅंड्री, सैराट आणि झुंड असे सामाजिक प्रश्न मांडणारे चित्रपट, नाळ’ सारखा भावनीक चित्रपट किंवा सध्या चर्चेत असलेला बहुभाषीक ‘घर बंदूक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani)  हा चित्रपट असो. नागराज च्या आटपाट (Aatpat) प्रोडक्शन ने नेहमीच प्रेक्षकांना दर्जेदार चित्रपट दिले आहेत.

या संपूर्ण प्रवासात नागराजला खंबीर साथ देणारी एक व्यक्ती म्हणजे गार्गी कुलकर्णी (Gargi Kulkarni) . कधी assistant director, costume designer तर कधी production head,   कार्यकारी निर्माती आशा वेगवेगळ्या धुरा गार्गी ने लीलया सांभाळल्या आहेत. नागराज आणि गार्गी गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या ‘घर बंदूक बिरयानी’च्या music launch सोहळ्याच नागराजने प्रसार माध्यमांसमोर पहिल्यांदाच गार्गी ची बायको म्हणून ओळख करून दिली.  तसेच या सोहळ्याच्या निमित्ताने नागराज आणि गार्गी यांचा मुलगा ‘राया’ हा देखील पहिल्यांदाच मीडिया समोर आला.

यावेळी नागराजने माध्यमांना आपल्या मुलाची देखील ओळख करून दिली. इतकेच नव्हे तर आगामी ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात हा ‘लिटील स्टारकिड’ देखील प्रेक्षकांना दिसणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading