Wednesday, May 27, 2026
ENTERTAINMENTLatest News

अश्विनी सर्व संघर्षांवर मात करून स्पर्धा जिंकेल?

प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणारी  ‘तू चाल पुढं‘  ही मालिका लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. मिसेस इंडिया कॉम्पिटिशनमध्ये अश्विनीला कॉर्नर करण्याचा प्रयत्न तिच्या सोबतच्या इतर स्पर्धकांकडून केला जातो. ज्यामुळे मिडियामध्ये अश्विनीला टारगेट केलं जातं. पण यावेळी एपी तिच्या पाठीशी उभा राहतो आणि अश्विनीला सपोर्ट करतो. इकडे श्रेयस बंगलोरला गेला आहे आणि त्याला सरप्राईज द्यायला अश्विनी बंगलोरला जातो, तिथे फक्त दोघांना वेळ मिळतो म्हणून श्रेयस खुश होतो. या सगळ्या दरम्यान अश्विनीची इंग्रजीची पण तयारी सुरू आहे. आता अश्विनी तिच्या सर्व संघर्षांवर मात करून स्पर्धा जिंकेल?  हे पाहणं प्रेक्षकासाठी औत्सुक्याचं असणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ‘तू चाल पुढं’ सोमवार ते शनिवार रात्री ७.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading