मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा राजीनामा
नवी दिल्ली : दिल्ली सरकारमधील दोन महत्वाचे मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia )आणि सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांनी अखेर त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. तर जैन 9 महिन्यांपासून तुरुंगात आहेत.
केजरीवाल यांच्यानंतर मनीष सिसोदिया हे आप पक्षातील सर्वात मोठे नेते आहेत. सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारमधील एकूण 33 पैकी 18 खाती आहेत. सत्येंद्र जैन हे आधीच तुरुंगात आहेत. जैन यांच्या विभागांचे कामही सिसोदिया पाहत होते. सिसोदिया यांच्याकडे शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, वित्त, उत्पादन शुल्क, ऊर्जा, पाणी, आरोग्य अशी महत्त्वाची खाती होती.
