Wednesday, May 27, 2026
ENTERTAINMENTLatest News

२ करोड रुपये जिंकण्याची संधी !  कोण होणार करोडपती चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

करोडपती होण्याचं स्वप्न प्रत्येक जण पाहतोपण सर्वसामान्यांचं हे स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा घेऊन आली आहेस्वबळ आणि ज्ञान यांच्या मदतीने मिळणार्या यशाची चव चाखण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हाकारण लवकरच येतंय  कोण होणार करोडपती चं पुढचं  पर्वधनलक्ष्मीप्रतिष्ठा आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्याची हीच वेळ आहेकोण होणार करोडपती या जगद्विख्यात कार्यक्रमाच्या  या पर्वामध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया आता सुरू होते आहे.  या वर्षी स्पर्धकांना  मिस्डकॉल देऊन दोन करोड रुपये जिंकण्याची संधी आहे!

सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार करोडपती हा मराठी रिॲलिटी शो अल्पावधीतच लोकप्रिय ठरलामनोरंजनासह ज्ञानार्जन  हे वैशिष्ट्य असणार्या या कार्यक्रमात  अवगत असलेलं आणि मिळवलेलं ज्ञान तुम्हांला यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाऊ शकतंयाची प्रचिती मागच्या पर्वांमधून सगळ्यांना आली आहेया कार्यक्रमामध्ये आलेल्या स्पर्धकांची स्वप्नपूर्ती झाली आहेप्रत्येक घरासाठी आणि घरातील प्रत्येकासाठी सोनी मराठी वाहिनी हि संधी घेऊन येत आहे.

 कोण होणार करोडपती  या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेतसचिन खेडेकर उत्तम अभिनेते आहेतचपण स्पर्धेतल्या स्पर्धकांशी प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचं कामही ते मोठ्या कौशल्यानी करतातत्यामुळे स्पर्धेतले सहभागी स्पर्धक अधिक आत्मविश्वासानी आणि  चांगल्या प्रकारे खेळू शकतात.

 या वर्षी सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या स्पर्धकांना १४ दिवसांत १४ प्रश्न विचारण्यात येणार आहेतजितके जास्त प्रश्न तितक्याच जास्त संधीकोण होणार करोडपती  या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी  मार्चपासून नोंदणी सुरू होते आहे मार्चपासून १५ मार्चपर्यंत रोज एक प्रश्नअसे १४ प्रश्न विचारले जाणार आहेत७०३९०७७७७२  या क्रमांकावर मिस्डकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षकांना नोंदणी करता येईलसोनी मराठी  वाहिनीने कोण होणार करोडपती या कार्यक्रमाद्वारे  मिस्डकॉल देऊन  करोड जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

करोडपती होण्याचं तुमचं स्वप्न आता खऱ्या अर्थानं साकार होऊ शकतं मार्चपासून १५ मार्चपर्यंत रोज एक प्रश्नज्ञानमनोरंजन आणि रसिक प्रेक्षकांचं प्रेम मिळवण्यासाठी तयार राहाकारण सोनी मराठी वाहिनी लवकरच घेऊन येणार आहेकोण होणार करोडपती!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading