एडटेक फर्म जॅरो एज्युकेशनने एनआयटीआयइ (NITIE), मुंबई बरोबर केली भागीदारी
मुंबई : अग्रगण्य एडटेक फर्म जॅरो एज्युकेशनने जागतिक ऑनलाइन अभ्यासक्रम आणि कार्यकारी कार्यक्रम प्रदान करण्यासाठी भारतातील आघाडीच्या बी-स्कूल नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजीनीरिंग (NITIE), मुंबई बरोबर भागीदारी केली. या भागीदारीतून जॅरो एज्युकेशनचे ध्येय मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीसाठी राष्ट्रीय मास्टर प्लॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएम गती शक्ती योजनेअंतर्गत शासनाच्या दृष्टीला बळकटी देण्याचे आहे. कंपनी सर्वसमावेशक शिक्षणाचा अनुभव आणि बरेच काही देण्याची खात्री देत एक अनोखे कार्यकारी शिक्षण आणणार आहे, ज्यामध्ये डिजिटल पुरवठा साखळी (डिजिटल सप्लाय चेन), विश्लेषण (अॅनॅलिटिक्स), तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी) इत्यादी यांसारख्या विस्तृत क्षेत्रांचा समावेश असेल.
या उपक्रमाच्या अनुषंगाने जॅरो एज्युकेशन आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजीनीरिंग (NITIE) ने अलीकडेच बिझनेस अॅनॅलिटिक्स: फ्रॉम डेटा टु इनसाइट्स अँड डिसिजन मेकिंग’ हा जागतिक ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचे नेतृत्व जगप्रसिद्ध व्यवस्थापन शास्त्रज्ञ आणि विचारवंत प्राध्यापक श्री. डॅव्हिड सिम्ची- लेवी (एमआयटी, यूएसए) हे करीत आहेत. सहभागी विद्यार्थ्यांना तीन प्रमुख उद्दिष्टे साध्य करता यावेत म्हणून विश्लेषण विषयामध्ये हा अभ्यासक्रम काळजीपूर्वक तयार केला गेला आहे:
- सखोल व गंभीर विचार व माहितीचे आकलन वाढविणे.
- पुरवठा साखळी डिजिटायझेशनद्वारे तथ्य, आकडेवारी व माहितीच्या आधाराने धोरणात्मक निर्णय घेण्यास सक्षम करणे
- व्यवसाय विश्लेषणाद्वारे मूल्य निर्मितीच्या संधी ओळखणे.
या अभ्यासक्रमपूर्वी प्राध्यापक डेव्हिड यांनी नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजीनीरिंग (NITIE) सह पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि डेटा विश्लेषणावर सात जागतिक ऑनलाइन प्रमाणन अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. २० पेक्षा जास्त देशांमधून १२,००० हून अधिक सहभागींना आकर्षित करणारे हे अत्यंत प्रभावी असे अभ्यासक्रम होते. शिवाय एक्सेंचर, सिप्ला, एचयूएल, कमिन्स, एचपीसीएल यांसारख्या प्रमुख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी या अभ्यासक्रमांमध्ये भरपूर स्वारस्य देखील दाखवले.
जॅरो एज्युकेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रंजिता रमण या भागीदारीविषयी बोलताना म्हणाल्या, “नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजीनीरिंग (NITIE) जागतिक स्तरावर फार नावाजलेले असून त्याचे एक मजबूत स्थान आहे. व्यावसायिकांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करणे हे आमचे नेहमीच ध्येय राहिले आहे आणि त्यामुळेच ते त्यांच्या नोकरी व्यवसायात निपुण बनतात. आमच्या भागीदारीद्वारे आम्ही कार्यरत व्यावसायिकांना उच्च गुणवत्तेचे व किफायतशीर कार्यक्रम प्रदान करण्याची आशा करतो; ज्यामुळे त्यांना विशिष्ट कौशल्ये विकसित करण्यात मदत होईल आणि त्यांना जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्पर्धेत यशस्वीपणे पुढे जाता येईल.”
नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजीनीरिंग (NITIE), मुंबई चे संचालक प्राध्यापक मनोज के. तिवारी म्हणाले, “भारतातील प्रमुख एडटेक व्यवसायांपैकी एक असलेले जॅरो एज्युकेशन हे व्यवसाय आणि शिक्षण यांच्यातील एक मजबूत दुवा म्हणून जागतिक दर्जाचे शिक्षण अनुभव विकसित करण्यात आघाडीवर आहे. असा अत्यंत समर्पक अभ्यासक्रम मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे, जो व्यावसायिकांना अवघड समस्या योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी, कार्यात्मक व धोरणात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि व स्पर्धात्मक लाभ मिळविण्यासाठी प्रतिभा, ज्ञान आणि कौशल्ये विकसित करण्यात मदत करू शकतो.”
जॅरो एज्युकेशनने जागतिक दर्जाचे कार्यकारी शिक्षण कार्यक्रम देण्यात उत्कृष्ट कामगिरी करणे सुरू ठेवले आहे, ज्यायोगे जगातील नामांकित आणि प्रमुख संस्था व विद्यापीठे यांच्या सहकार्याने व्यावसायिकांना त्यांच्या व्यावसायिक करियरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान विकसित करण्यात मदत करता येईल. अलीकडे, जॅरो एज्युकेशनने आयआयएम इंदौर, आयआयटी गुवाहाटी, आयआयटीएम प्रवर्तक, व्हार्टन इंटरअॅक्टिव, रोटमन स्कूल ऑफ मॅनेजमेंट (टोरोंटो विद्यापीठ) आणि बऱ्याच अजून संस्थांसोबत भागीदारी केली आहे.
