Thursday, May 28, 2026
BusinessLatest News

फुलर्टन इंडिया कडून महाराष्ट्रातील 12 हजारांहून अधिक पशुंना मोफत उपचार 

पुणे : भारतातील अग्रगण्य गैर बँकिंग वित्त कंपन्यांपैकी (NBFC) एक असलेल्या फुलर्टन इंडियाने वार्षिक पशु विकास दिवस (PVD) द्वारे सर्वात मोठ्या ऑन ग्राउंड पशुसंवर्धन जागरूकता मेळाव्याचे आयोजन केले. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी ४७ ठिकाणी पशुसंवर्धन मेळावा घेण्यात आला, ज्यामध्ये १२,१०० हून अधिक पशुंना मोफत तपासणी आणि वैद्यकीय सेवा देण्यात आली. फुलर्टन इंडियाने ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये राज्यभरात ३८ ठिकाणी मोफत पशुआरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली होती, ज्याचा ३,९०० हून अधिक पशुपालकांना लाभ झाला.

     एका मोठ्या कार्यक्रमाचा एक भाग असलेली ही शिबिरे एकाच वेळी ३७४ हून जास्त ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये १५ राज्यांमधील ५०० हून अधिक गावांचा समावेश होता. या शिबिरांमधून ७१,४०० पेक्षा जास्त पशुंवर उपचार करण्यात आले.

या शिबिरांमध्ये पशुवैद्यकांकडून पशुधनाची मोफत तपासणी, गुरांसाठी मोफत औषधे व लसीकरण आणि दुभत्या जनावरांचे उत्पादन वाढविण्याबाबत सल्ला अशा सेवा देण्यात आल्या. फुलर्टन इंडियाने ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये संपूर्ण भारतात २४५ हून अधिक ठिकाणी मोफत पशुआरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली होती, ज्याचा २०,४०० पेक्षा जास्त पशुपालकांना लाभ झाला.

कंपनीच्या या अनोख्या उपक्रमावर प्रकाश टाकताना फुलर्टन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक शंतनू मित्रा म्हणाले, “फुलर्टन इंडियामध्ये आम्ही पुरेश्या सेवा सुविधा उपलब्ध नसलेल्या समुदायांना सर्वांगीण दृष्टीने आर्थिक दृष्ट्‍या समृद्ध होण्यास सक्षम करतो आणि हे तत्व आम्हाला आमच्या ग्राहकांच्या जवळ जाण्यास व त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरते. तसेच समाजाच्या एकूण विकासामध्ये देखील मदत करते. आमचे सामाजिक विकास उपक्रम ग्रामीण समुदायांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांना चालना देण्यासाठी त्यांच्या उपजीविकेच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करतात. डोंगराळ आणि दुर्गम भागात राहणाऱ्यांसाठी पशुधन अत्यावश्यक असल्याने केवळ आमच्या ग्राहकांसाठीच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर संपूर्ण शेतकरी समुदायांसाठी पशु आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि सामाजिक मूल्य वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही दर वर्षी पशु विकास दिवस आयोजित करतो. या प्रयत्नांमुळे आम्ही पाहिले आहे की, पशुपालकांनी त्यांच्या पशुधनाची उत्पादकता वाढवतात, त्यांचे घरगुती उत्पन्न वाढवतात आणि सकारात्मक सामाजिक प्रभाव देखील पाडतात.”

कंपनीने आपला पहिला पशु विकास दिवस २०१४ मध्ये संपूर्ण भारतातील विविध ठिकाणी एकदिवसीय पशु तपासणी आणि गुरांची काळजी शिबिर म्हणून सुरू केले, ज्यामध्ये कंपनीचे कर्मचारी ग्रामीण भागातील पशुपालकांना त्यांच्या गुरांची काळजी घेण्यात मदत करण्यासाठी ग्रामीण समुदायाशी जोडले गेले.

गेल्या काही वर्षांमध्ये फुलर्टन इंडियाने पशुपालकांना आवश्यक पशु आरोग्य सेवा सुविधा आणि मार्गदर्शन प्रदान करण्यात मदत केली आहे, जेणेकरून ते त्यांच्या पशुंची उत्पादकता सुधारू शकतील आणि पर्यायाने त्यांचे घरगुती उत्पन्न वाढवू शकतील. पशु विकास दिनाच्या माध्यमातून आजवर २,७१,००० पेक्षा अधिक पशुंवर उपचार केले गेले आहेत आणि ८०,००० हून अधिक पशुपालकांनी लाभ घेतला आहे.

पशु विकास दिनाबाबत सांगताना फुलर्टन इंडियाचे प्रमुख लोक अधिकारी (CPO) स्वामीनाथन सुब्रमणियन म्हणाले, “भारताच्या दुर्गम भागातील अनेक ग्रामीण शेतकरी त्यांच्या उत्पादनासाठी पशुपालनावर अवलंबून आहेत. आमच्या वार्षिक पशु विकास दिन या उपक्रमाद्वारे आम्ही या समुदायाला दर्जेदार पशु आरोग्य सेवा उपलब्ध करून देऊन व त्यांना एक नेटवर्किंग व्यासपीठ प्रदान करून सशक्त करण्याचे ध्येय ठेवतो. यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना एका विशिष्ट उद्दिष्टसाठी स्वयंसेवा करण्याची आणि सामाजिक ऋण परत फेडण्याची संधी देखील मिळाली.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading