‘हिंदुत्वाच्या बुरख्याखाली’ कसब्यातील चोऱ्या, भ्रष्टाचार व बकालपणा लपणारा नाही..! काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे – तब्बल ४ वेळा स्थायी समिती अघ्यक्ष पदाच्या माध्यमातुन देखील, भाजप ऊमेदवाराची कसबा मतदार संघातील विकास कामे सांगताच् येत नसल्याने, अखेर भाजप ला बॅकफूटवर जाऊन, पुन्हा ढोंगी हिंदुत्वाचा आधार घ्यावा लागतो.. हेच उपमुख्य मंत्री सहीत भाजप चे अपयश आहे अशी उपरोधिक टिका काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कसब्यातील प्रचाराच्या भाषणावर ऊत्तर दाखल केली..!
साधारण २ वर्षा नंतर ‘स्थायी समिती – सदस्य’ बदलले जातात, मात्र कसब्याचे भाजप ऊमेदवार श्री हेमंत रासने यांना सु ५ वर्षे सदस्यपद व त्यात ४ वेळा सलग अध्यक्षपद देण्यात त्यांचा विकासाचा कोणता पराक्रम भाजप श्रेष्ठींनी पाहीला..(?) असे विधान करून, सु ५०० कोटींचा (खोक्यांचा) निघी मविआ सरकार पाडण्या करीता केला काय (?) असा जळजळीत सवाल देखील काँग्रेस ने केला..!
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांनी ‘स्थायी समिती कामे अडवत असल्याचा आरोप व्हायरल होत असुनही भाजप नेते मात्र यावर मुग गिळून गप्प का..(?) असा सवाल ही केला आहे..!
भाजप’चा बाले किल्ला म्हणुन सतत पेठां मधील मतदारांना गृहीत धरून त्यांची सतत फसवणुक करणे, त्यांना गंडवणे, त्यांचे प्रती ‘विकासा बाबत व लोकप्रतिनिधीपर कर्तव्या बाबत अनासक्त रहाणे, बेफिकीर रहाणे हे सुज्ञ व शिक्षीत मध्यमवर्गीय यंदा सहन करणार नाहीत व प्रभागात कधीही न फीरणाऱ्या मात्र विधानसभेसाठी ऊच्च निधीचा भ्रष्टाचार करण्यासाठी आसुसलेल्या ऊमेदवाराची जागा मतदार दाखवणार असल्याचे ‘सर्वे – रिपोर्ट’ मिळाल्यामुळेच.. भाजप नेत्यांवर ही निवडणुक ‘विकासावर नव्हे.. तर हिंदुत्वावर’(?) लढण्याची नामुष्की ओढावल्याची प्रखर टिका देखील कोँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!
मात्र काँग्रेसची जनतेप्रति बांधिलकी, विकासा बाबत चे ऊत्तर दायित्व, सामाजिक सलोखा – शांतता व बंधुत्व यास जनता प्राघान्य देईल असा विश्वास देखील काँग्रेस ने व्यक्त केला. शिव छत्रपतीं पासुन, महात्मा फुले दंपत्ती ते डॅा आंबेडकरांचा वेळो वेळी अवमान करणाऱे, राज्यपाल कोश्यारींचे बदली नंतर देखीव त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंत्री मंडळात करणारे.. जनतेस मुर्ख व अज्ञानी समजतात काय (?) असा संतप्त सवाल करून, निव्वळ ‘मतांच्या लालसेपोटी त्यांचा जयघोष करण्याचा दुटप्पीपणा’ सुज्ञ, सुशिक्षीत व स्वाभिमानी पुणेकर ओळखून आहेत व निवडणुकीत याची प्रचिती भाजप’स येईल असा विश्वास देखील काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे..!
