Monday, October 26, 2026
BusinessLatest News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला सिजन मॉलमध्ये उजाळा

पुणे : ढोल ताशे आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, सादर होणाऱ्या पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले आबालवृद्ध…… तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या वेषात असणारे मावळे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी महाराजांची देखणी मूर्ती, आलिशान शामियाना, हजारो फुलांची आरास, फुलांची तोरणे विविध उपक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हडपसर, मगरपट्टा येथील सीजन मॉलमध्ये उत्साहात साजरी केली.

पहिल्यांदाच मॉलमध्ये अशी अनोख्या पद्धतीने शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाल्याने अनेकांनी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading