Monday, October 26, 2026
Latest NewsPUNE

रेडक्रॉस सोसायटी दवाखान्यात नवीन सिटी स्कॅन मशीन चे उद्घाटन

पुणे : इंडीयन रेड क्रॉस सोसायटी पुणे जिल्हा शाखा रास्ता पेठ दवाखान्यात नवीन अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन चे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.
या उपक्रमासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड च्या सी एस आर उपक्रमा अंतर्गत लाभलेल्या भरीव आर्थिक मदतीमुळे ही सुविधा सुरू करण्यात आली, या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिथी माननीय
, पद्मश्री उद्योजक श्री मिलिंद कांबळे संस्थापक अध्यक्ष DICCI, चेअरमन IIM जम्मू, श्री अजय नाखले डेप्युटी जनरल मॅनेजर नॅशनल इन्शुरन्स, तसेच राजी श्रीनिवास नॅशनल इन्शुरन्स , रेड क्रॉस संस्थेचे पुणे शाखा अध्यक्ष डॉक्टर विक्रम फाटक, उपाध्यक्ष माब्रीन नानावटी, तसेच मानद सचिव प्राध्यापक आर व्ही कुलकर्णी, प्रख्यात उद्योगपती मा. अजय शिर्के,आणि संस्थेचे इतर पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. सिटी स्कॅन सुविधा अत्यंत माफक दरात, ना तोटा ना नफा या तत्त्वावर सर्वांसाठी आज पासून उपलब्ध करण्यात आली आहे.
संस्थेने सर्व गरजू व्यक्तींना या सुविधा व अन्य वैद्यकीय सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading