Monday, October 26, 2026
Latest NewsSports

दिव्यांग क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन

पुणे : दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग (अस्थिव्यंग) पुरुष क्रिकेट खेळाडूंना सुचित करण्यात येते की ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज, मुंबई, इंडिया यांचे परवानगीने तसेच दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा व पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निवड चाचणी शिबिर दिनांक २० फेब्रुवारी सोमवार रोजी निंबाळकर ग्राउंड, शाहू कॉलेज, पुणे येथे सकाळी ठीक १० वाजता आयोजित करण्यात आलेले आहे.

तरी महाराष्ट्रातील सर्व अस्थिव्यंग दिव्यांग खेळाडूंनी या निवड चाचणी शिबिरास उपस्थित राहून क्रीडा कौशल्य सादर करावे. सदर निवड चाचणी शिबिर हे माजी रणजी खेळाडू मिलिंद गुंजाळ, श्रीकांत काटे व पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन या त्रिस्तरीय निवड चाचणी सदस्यांच्या मार्फत होणार आहे. सदर निवड चाचणी शिबिरातून मार्च महिन्यात पुणे येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ खेळणार आहे. तरी ९८२२८४१५१६ व ८४५९५९७३०८ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा सचिव राजू मुजावर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading