Wednesday, May 27, 2026
ENTERTAINMENTLatest News

कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजाराकरीता मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया सुरू

मुंबई  : फ्रान्स येथे कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १६ ते २४ मे २०२३ या कालावधीत संपन्न होत आहे. या महोत्सवाच्या चित्रपट बाजारात ( फिल्म मार्केट) राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत निवड प्रक्रिया करून तीन मराठी चित्रपटांना पाठविण्यात येणार आहे. यासाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत सेन्सॉर झालेल्या मराठी चित्रपटांच्या निर्मिती संस्थांनी निवडप्रक्रियेसाठी दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत प्रवेशिका अर्ज पाठविण्याचे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

निर्मिती संस्थांना प्रवेशिका अर्ज महामंडळाच्या http://www.mumbaifilmcity.org संकेतस्थळावर उपलब्ध असून निर्मितीसंस्थांनी प्रवेशिका अर्ज विहित कागदपत्रासह महामंडळाच्या जनसंपर्क विभागात सादर करता येतील अथवा cfffm२०२३@gmail.com या मेलवरही पाठविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

मदत कक्षाची स्थापना

मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सन २०१६ पासून राज्य शासनाच्या वतीने महामंडळामार्फत निवडप्रक्रियाकरून मराठी चित्रपट कांस चित्रपट बाजारात सहभागी होत असतात. यंदाही या महोत्सवात निवडप्रक्रिया करून मराठी चित्रपटाना सहभागाची संधी मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मराठी चित्रपटांनी या निवडप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क विभागात मदत कक्षाची ( हेल्प डेस्क) स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत निर्मितीसंस्थांना प्रवेशिका अर्ज भरताना आणि संकुल चित्रपट महोत्सवाबाबत आवश्यक माहिती वेळोवेळी देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading