Wednesday, May 27, 2026
Latest NewsSports

फुड कॉपोर्र्रेशन ऑफ इंडिया, एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ऑईल इंडिया लिमिटेड संघांनी उद्धघाटनाचा दिवस गाजवला !!

अखिल भारतीय सार्वजनिक विभाग फुटबॉल स्पर्धा !!

पुणे : भारतीय खाद्य निगम (फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) आणि एडएसपीसी, पश्‍चिम यांच्या तर्फे आयोजित अखिल भारतीय सार्वजनिक विभाग फुटबॉल स्पर्धेत फुड कॉपोर्र्रेशन ऑफ इंडिया, एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि ऑईल इंडिया लिमिटेड या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उद्धघाटनाचा दिवस गाजवला.

श्री शिवछत्रपती क्रिडा संकूल, बालेवाडी येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत फुड कॉपोर्र्रेशन ऑफ इंडिया संघाने बँक ऑफ बरोदा संघाचा ५-० असा सहज पराभव केला. सामन्यामध्ये हिमांशु राय याने ३ गोल मारले. योगेश प्रसाद आणि पियुष भंडारी यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. अनुपम ठाकूर याच्या गोलपूर्ण कामगिरीच्या जोरावर एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाने रिर्झव्ह बँक ऑफ इंडिया संघाचा १-० असा पराभव करून विजयी सलामी दिली.

ऑईल इंडिया लिमिटेड संघाने न्यावली लिग्नाइट कॉर्पोरेशन (एनएलसी) इंडिया संघाचा १७-० असा धुव्वा उडविला. सामन्यामध्ये तुलया दास याने ७ गोल मारले. मिलन बासुमात्रे याने ४ गोल मारले. सुदेम वारी, अकरंग नारझारे, शिशुराम चुटीया, सॅनसंग साईकिया, गेरेमशा बासुमात्रे आणि दिपज्योती दिलमारे यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.

स्पर्धेचे उद्धघाटन ईएसआयसी पुणेचे उपसंचालक एच.के. पांड्ये, भारतीय विमान प्राधिकरणचे संचालक संतोश डोके, फुड कॉपोर्र्रेशन ऑफ इंडियाचे पश्‍चिम विभागिय मुख्य सरव्यवस्थापक एस.के. साहेब, फुड कॉपोर्र्रेशन ऑफ इंडिया, पुणेचे विभागिय व्यवस्थापक मनीषा मीना यांच्या हस्ते करण्यात आले.

या भारतीय सार्वजनिक विभागाच्या एकूण ९ संघांनी भाग घेतला आहे. फुड कॉपोर्र्रेशन ऑफ इंडिया, एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एअर इंडिया, कोल इंडिया, न्यावली लिग्नाइट कॉर्पोरेशन (एनएलसी) इंडिया लि., रिर्झव्ह बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोदा, एम्प्लॉई प्रोव्हिडन्ट फंड ऑर्गनायझेशन (इपीएफओ) आणि ऑईल इंडिया लिमिटेड हे संघ विजेतेपदासाठी लढणार आहेत.

स्पर्धेचा निकालः गटसाखळी फेरीः
फुड कॉपोर्र्रेशन ऑफ इंडियाः ५ (योगेश प्रसाद १३ मि., हिमांशु राय १७, ४८, ६१ मि., पियुष भंडारी ६५ मि.) वि.वि. बँक ऑफ बरोदाः ०;
एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाः १ (अनुपम ठाकूर ५५ मि.) वि.वि. रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाः ०;
ऑईल इंडिया लिमिटेडः १७ (मिलन बासुमात्रे १, ११, २६, ५५ मि., तुलया दास ६, १७, २०, ५३, ५८, ६३, ६८ मि., सुदेम वारी २९ मि., अकरंग नारझारे ३१ मि., शिशुराम चुटीया ३९ मि., सॅनसंग साईकिया ७० मि., गेरेमशा बासुमात्रे ७५ मि., दिपज्योती दिलमारे ८० मि.) वि.वि. न्यावली लिग्नाइट कॉर्पोरेशन (एनएलसी) इंडियाः ०;

फोटो ओळीः फोटो १ आणि २: स्पर्धेच्या उद्धघाटनप्रसंगी खेळाडूंसाोबत हास्तांदोलन करताना ईएसआयसी पुणेचे उपसंचालक एच.के. पांड्ये.

अ‍ॅक्शन फोटो १: फुड कॉपोर्र्रेशन ऑफ इंडिया (हिरवा रंग) आणि बँक ऑफ बरोदा (नारंगी रंग) यांच्या सामन्यातील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading