Wednesday, May 27, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

राज्यात २ हजार ५५० नैसर्गिक शेती समूह स्थापन करण्यात येणार- कृषी आयुक्त सुनील चव्हाण

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाबाबत एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

 

पुणे : राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजनेच्या प्रचार प्रसिद्धी व जनजागृतीसाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा) येथे राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या राष्ट्रीय कार्यशाळेत राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण, केंद्र शासनाच्या आय एन एम विभागाच्या सल्लागार डॉ. वंदना द्विवेदी, राष्ट्रीय सेंद्रिय व नैसर्गिक शेती केंद्राचे संचालक डॉक्टर गगनेश शर्मा, विभागीय सेंद्रिय व नैसर्गिक शेती केंद्राचे विभागीय संचालक अजय सिंग राजपूत, आत्माचे संचालक दशरथ तांभाळे, हरिधारा कृषी समितीचे संस्थापक मारुती माने उपस्थित होते.

कृषी आयुक्त सुनील चव्हाण म्हणाले, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत राज्यात २ हजार ५५० नैसर्गिक शेती समूह स्थापन करण्यात येणार असून राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्वेच्छेने नैसर्गिक, विषमुक्त शेतीकडे वळावे.

श्रीमती वंदना द्विवेदी यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजनेच्या मार्गदर्शक सूचनेबाबत सविस्तर माहिती देत सांगितले, एका ग्रामपंचायतीतील ५० हेक्‍टर क्षेत्राचा एक समूह करायचा असून या समूहातील शेतकऱ्यांना शेती शाळेमार्फत प्रशिक्षण, क्षेत्रीय भेटी आयोजित करण्यात याव्यात.

गगणेश शर्मा यांनी नैसर्गिक शेतीच्या प्रमाणीकरणाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. मध्यप्रदेश राज्यातील मारुती माने यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेती बाबत स्वतःचे अनुभव व्यक्त केले.

कार्यशाळेत नैसर्गिक शेती विषयक घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यशाळेस सर्व राज्यातील प्रकल्प उपसंचालक आत्मा, कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी तसेच गोवा, तेलंगणा, दादरा नगर हवेली आदी राज्यातून अधिकारी कर्मचारी तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading