चांगल्या मागणीमुळे फिनोलेक्स इंडस्ट्रीजकडून ९२% वाढीचा अहवाल
पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (NSE:FINPIPE BSE:500940) ने आज झालेल्या त्यांच्या बोर्डाच्या बैठकीत ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिसर्या तिमाहीचे लेखापरीक्षण न केलेले आर्थिक निकाल जाहीर केले.
Key Financial Highlights (Standalone): (INR- Cr)
| Rs. In Crores | Q3 FY23 | Q3 FY22 | % Change | 9M FY23 | 9M FY22 | % Change |
| Total Income from operations | 1,124.76 | 1,004.73 | 11.95% | 3,255.99 | 3,052.76 | 6.66% |
| EBITDA gain/(loss) | 91.89 | 241.90 | -62.01% | 75.11 | 753.42 | -90.03% |
| EBITDA % | 8.17% | 24.08% | 2.31% | 24.68% | ||
| Depreciation | 22.5 | 21.18 | 65.40 | 61.85 | ||
| Profit/ (loss) before interest & tax | 69.39 | 220.72 | -68.56% | 9.71 | 691.57 | -98.60% |
| EBIT % | 6.17% | 21.97% | 0.30% | 22.65% | ||
| Finance costs | 5.14 | 0.85 | 20.77 | 6.02 | ||
| Other Income | 27.95 | 19.37 | 92.18 | 64.06 | ||
| Profit/(loss) before tax | 92.2 | 239.23 | -61.46% | 81.12 | 749.60 | -89.18% |
| PBT % | 8.20% | 23.81% | 2.49% | 24.55% | ||
| Tax | 20.51 | 61.46 | 3.23 | 189.93 | ||
| Profit/(loss) after tax | 71.69 | 177.77 | -59.67% | 77.90 | 559.67 | -86.08% |
| PAT % | 6.37% | 17.69% | 2.39% | 18.33% | ||
| Sales in MT | ||||||
| PVC Resin (External) | 4,863 | 10,984 | -55.73% | 23,576 | 33,394 | -29.40% |
| Pipes and Fittings | 90,396 | 46,994 | 92.36% | 2,21,574 | 1,58,266 | 40.00% |
आर्थिक वर्ष २३ च्या तिसऱ्या तिमाहीतील ठळक मुद्दे:
- कामकाजामधून मिळणारे एकूण उत्पन्न आर्थिक वर्ष २२ च्या तिसऱ्या तिमाहीतील १,००४.७३ कोटी रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २३ च्या तिसऱ्या तिमाहीतील उत्पन्न ११.९५% ने वाढून १,१२४.७६ कोटी रुपये होते
- पाईप्स आणि फिटिंग्स विभागातील व्हॉल्यूम आर्थिक वर्ष २२ च्या तिसऱ्या तिमाहीतील ४६,९९४ एमटीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २३ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये ९२.३६% ने वाढून ९०,३९६ एमटी झाला.
- पीव्हीसी रेझिन विभागातील व्हॉल्यूम आर्थिक वर्ष २२ च्या तिसऱ्या तिमाहीतील ४३,४६४ एमटीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २३ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये ४९%नी वाढून ६४,६९६ एमटी झाला.
- आर्थिक वर्ष २२ च्या तिसऱ्या तिमाहीत EBITDA २४१.९० कोटी रुपये होता तर आर्थिक वर्ष २३ च्या तिसऱ्या तिमाहीत तो ९१.८९ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीत EBITDA तोटा १४२.६७ कोटी रुपये होता.
- PAT आर्थिक वर्ष २२ च्या तिसऱ्या तिमाहीत १७७.७७ कोटी रुपये होता तर आर्थिक वर्ष २३ च्या तिसऱ्या तिमाहीत ७१.६९ कोटी रुपये होता.
आर्थिक वर्ष २३ च्या नऊमाहीतील ठळक मुद्दे:
- कामकाजामधून मिळणारे एकूण उत्पन्न आर्थिक वर्ष २२ च्या नऊमाहीतील ३०५२.७६ कोटी रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २३ च्या नऊमाहीतील उत्पन्न ६.६६% ने वाढून ३,२५५.९९ कोटी रुपये होते
- पाईप्स आणि फिटिंग्स विभागातील व्हॉल्यूम आर्थिक वर्ष २२ च्या नऊमाहीतील १,५८,२६६ एमटीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २३ च्या नऊमाहीमध्ये ४०% ने वाढून २,२१,५७४ एमटी झाला.
- रेझिन विभागातील व्हॉल्यूम आर्थिक वर्ष २२ च्या नऊमाहीतील १,४५,७४२ एमटीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २३ च्या नऊमाहीमध्ये २४.५४%नी वाढून १,८१,५०६ एमटी झाला.
- आर्थिक वर्ष २२ च्या नऊमाहीत EBITDA ७५३.४२ कोटी रुपये होता तो ९०.०३% नी कमी होऊन आर्थिक वर्ष २३ च्या नऊमाहीत तो ७५.११ कोटी रुपये झाला.
- आर्थिक वर्ष २२ च्या नऊमाहीत करानंतरचा नफा ५५९.६७ कोटी रुपयांवरुन ८६.०८%नी कमी होऊन आर्थिक वर्ष २३ च्या नऊमाहीत ७६.९० कोटी रुपये झाला.
तिमाही निकालांवर भाष्य करताना, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष श्री. प्रकाश पी. छाब्रिया म्हणाले, “सध्याच्या पातळीवरील किंमतीतील स्थिरता आणि एकूण मागणीच्या परिस्थितीमुळे बाजारपेठेत शाश्वत वाढ होऊ शकते. किमतीतील सुधारणांमुळेही मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत पीव्हीसी किमतींमध्ये तीव्र घसरण आणि परिणामी कंपनीच्या मिळकत कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम झाल्यानंतर तिसर्या तिमाहीत कंपनीच्या कामगिरीत मजबूत व्हॉल्यूम वाढीमुळे लक्षणीय सुधारणा झाली आहे.”
