fbpx

डॉ. संजय कुलकर्णी यांची युरोलॉजीकल सोसायटी ऑफ इंडिया’च्या अध्यक्षपदी निवड

पुणे :: शहरातील जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध मूत्रविकारतज्ज्ञ आणि युरोकुल या युरॉलॉजी केंद्राचे संस्थापक डॉ. संजय कुलकर्णी यांची ‘यूरॉलॉजीकल सोसायटी ऑफ इंडिया’ मूत्रविकारतज्ज्ञांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
नुकतेच नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या ‘युसिकॉन २०२३’ या राष्ट्रीय स्तरावरील मूत्रविकारविषयक परिषदेत डॉ. कुलकर्णी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुढील एक वर्षासाठी या पदाची जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे.

यूरॉलॉजीकल सोसायटी ऑफ इंडिया ही संघटना १९६० साली स्थापन करण्यात आली असून, संघटनेचे देशभरात तब्बल ५००० सदस्य आहेत. या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड होणारे डॉ. कुलकर्णी हे पुण्यातील तिसरे व्यक्ती आहेत. यापूर्वी डॉ. एस.एस.बापट आणि डॉ. दीपक किरपेकर यांनी संघटनेचे अध्यक्षपद भूषविले होते. डॉ. कुलकर्णी यांनी डॉ. रवींद्र सबनीस यांच्याकडून अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारली.

आपल्या निवडीबाबत डॉ. कुलकर्णी म्हणाले, “युरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या अतिशय प्रतिष्ठित संघटनेच्या अध्यक्षपदी निवड होणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. आपल्याकडे असणारे मूत्रविकारतज्ज्ञ हे मुतखडा शस्त्रक्रिया, रोबोटिक सर्जरी, युरेथ्रल स्त्रिक्चर सर्जरी अशा शस्त्रक्रियांमध्ये हे जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट तज्ज्ञ आहेत. त्यामुळेच भारताला जागतिक स्तरावरील ‘लर्निंग सेंटर’ बनवून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा माझा मानस आहे.’’

Leave a Reply

%d bloggers like this: