Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये योगदान देण्यासाठी क्युआर कोडची सुविधा

पुणे : सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये योगदान देता यावे यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने क्युआर कोडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून जिल्ह्यातील इच्छुक नागरिकांनी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

युद्ध क्षेत्रात किंवा अतिरेकी कारवायांमध्ये शहीद झालेले, अपंगत्व आलेले जवान तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियासाठी राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांकरीता लागणारा खर्च ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून उभारला जातो. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे कार्य जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत करण्यात येते.

ध्वजदिन निधीमध्ये देणगी देण्यात येणाऱ्या रक्कमेवर आयकर अधिनियम १९६१ कलम ८० जी (५) (६) च्या अंतर्गत आयकर सवलत लागू आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अजय पवार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading