Wednesday, August 26, 2026
Latest NewsPUNE

विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायनाने ‘श्रद्धा सुमन’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप

पुणे  : जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्या कसदार गायनाने आज श्रद्धा सुमन कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप झाला. तबलासम्राट पद्मविभूषण पं. किशन महाराज यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय व सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद कुमार आझाद यांच्या तालायन म्युझिक सर्कल संस्थेच्या वतीने ‘श्रध्दा सुमन’ या विशेष सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या आजच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायनाने झाला.

आपले गुरु पं. किशन महाराज यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने मागील २८ वर्षे दरवर्षी पं. अरविंद कुमार आझाद हे ‘श्रद्धा सुमन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. सदर वर्ष हे पं. किशन महाराज यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यानिमित्ताने वर्षभर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या या कार्यक्रम श्रुखंलेतील हा पाचवा कार्यक्रम असणार असून कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी आज महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या सहायक संचालिका सुनीता आसवले यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी अश्विनी भिडे देशपांडे यांनी राग काफी कानडाने आपल्या गायनाला सुरुवात केली. त्यांनी विलंबित तीन तालमध्ये ‘ लाई रे मद पिया…’ आणि द्रुत तीनतालमध्ये ‘कान्ह कुंवर के कर पल्लव ‘ या बंदिशी प्रस्तुत केल्या. यांनतर त्यांनी राग हंसध्वनी मध्ये ‘महाराज हो तुम मेरो…’ ही नऊ मात्रा मध्यताल मधील रचना पेश केली. द्रुत तीन तालातील तराणा प्रस्तुत केला. ‘रंग छिरकत रंग डारी रे श्याम मुरारी… ‘ ही होरी त्यांनी सादर केली. ‘ पिचकारी न मारो, भीज गयी नयी सारी…’ याने त्यांनी आपल्या
त्यांना पंडित अरविंद कुमार आझाद (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), श्रुती अभ्यंकर व ऋतुजा लाड (तानपुरा) यांनी साथसंगत केली. डॉ. सुनील देवधर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.गायनाचा व कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading