Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

रोहन सुरवसे पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा


पुणे: काँग्रेस प्रदेश युवक सरचिटणीस महाराष्ट्र राज्य व स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहनभैय्या सुरवसे पाटील यांचा वाढदिवस राज्याच्या विविध ठिकाणी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
स्वकर्तृत्वावर सामाजिक पटलावरून राज्याच्या राजकीय पटलावर आपल्या नावाचा ठसा उमटवणारे काँग्रेस प्रदेश युवक सरचिटणीस व स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांचा वाढदिवस राज्याच्या विविध ठिकानी विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

उमरी तालुकाच्या वतीने रोहन सुरवसे पाटील यांच्या मित्र मंडळाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना खाऊ वाटप करण्यात आला. त्याचबरोबर उमरी येथील शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. शैक्षणिक साहित्य वाटप करत असताना नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आकाश सैदामवार जिल्हा संपर्कप्रमुख राघोबा जामलवाड तालुकाध्यक्ष सदाशिव पालदेवाड सर व तसेच मूकबधिर शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.तर हातकणंगले येथेही स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे वतीने शालेय मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी मदन माळी,सोहम बेणे,किरण खांडेकर,स्वरूप खोत,अजित माने,अभिषेक धुमाळ, कार्तिक लोहार, जगदीश कवडे, आदित्य करडे, आदित्य मोरे, हर्षद बागे, सुदर्शन पाटील, अस्मित शेंडे,गणेश चोपडे, विद्यार्थी शिक्षक आदी उपस्थित होते. तसेच पै. अमोल भैय्या बागाव, व शाहु पुरी तालीम मित्र मंडळाच्या वतीने श्री पाझर पोळ संस्था शाहुपुरी कोल्हापूर येथील गोशाळेत चारा देऊन रोहन सुरवसे पाटील यांचा वाढदिवस साजरा केला.
काँग्रेस प्रदेश युवक सरचिटणीस महाराष्ट्र राज्य रोहन सूरवसे पाटील हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व म्हणून राज्याच्या विविध भागांत ओळखले जातात.सामाजिक कार्यातील त्यांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे.सतत गोरगरिबांना मदतीचा हात देणे,महापुरुषांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करणे, ,रक्तदान,अन्नदान,शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृध्द आश्रमात जाऊन तेथील नागरिकांना खाऊ देणे मायेचा आधार देणे असे उपक्रम त्यांचे नीत्याचे बनले आहे.यामुळे त्यांना मानणारा वर्ग प्रचंड मोठा आहे.त्यांचे सामाजिक कार्य कौतकास्पद असून, वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याच्या विविध भागांतून विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राबवत रोहन सुरवसे पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading