fbpx

बीएमसीसीत पदवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार संशोधन शिष्यवृत्ती

पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातील (बीएमसीसी) पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे.

पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन शिष्यवृत्ती योजना सुरू करणारे बीएमसीसी हे देशातील पहिलेच महाविद्यालय ठरले असल्याचा दावा महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे.

बळवंत गुळणीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या निधीच्या व्याजातून ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी ‘संशोधन कार्यपद्धती’ या विषयातील दोन क्रेडिटचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. दरवर्षी दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाईल.

डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणिक, सीए अभिजीत गुळणीकर, डॉ. वसुधा गर्दे, डॉ. प्रशांत साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच या योजनेचा महाविद्यालयात शुभारंभ करण्यात आला.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये समाजोपयोगी संशोधन करण्याच्या क्षमता असतात. अशा युवकांना संशोधनासाठी आवश्यक असणारे आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने योजना सुरू केल्याचे डॉ. कुंटे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: