fbpx

मॉडर्न व एच. व्ही. देसाई कॉलेज यांना संयुक्त विजेतेपद

  • ’किर्लोस्कर वसुंधरा ग्रीन कॉलेज क्लिन कॉलेज‘ पुणे स्पर्धेचा निकाल घोषित

पुणे : किर्लोस्कर वसुंधराच्या वतीने गेली 7 वर्षे ’ग्रीन कॉलेज क्लिन कॉलेज’ स्पर्धेचे आयोजन पुण्यातील महाविद्यालयीन स्तरावर होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या, 2022-23 शैक्षणिक वर्षातील स्पर्धेचा निकाल, संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी घोषित केला. मॉर्डन कॉलेज गणेश खिंड व एच. व्हि. देसाई कॉलेज यांनी संयुक्त विजेतेपद पटकाविले आहे.

’ग्रीन कॉलेज क्लिन कॉलेज’ हि आता एक चळवळ बनली आहे. विद्यार्थी, व्यवस्थापन समिती, प्राचार्य व प्राध्यापक यांच्या संयुक्त प्रयत्नातून कॉलेज परिसरात अनेक नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जातात व त्यांचे सादरीकरण या स्पर्धेत केले जाते. करोना काळातील दोन वर्षांमध्ये देखील अनेक महाविद्यालयांनी वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाविद्यालयीन संघांनी आपले सादरीकरण केले. पारितोषिक प्राप्त बहुतेक संघांनी राम नदी पुनरूज्जीवन अभियान विषयक प्रकल्पांचे सादरीकरण केले. त्यातील काही कल्पना त्यांनी प्रत्यक्ष अंमलात देखील आणल्या.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे :

प्रथम क्रमांक विभागून : एच. व्हि. देसाई व मॉर्डन कॉलेज, गणेश खिंड

व्दितीय क्रमांक : फर्गसन महाविद्यालय

तृतीय क्रमांक : डॉ. भानुबेन नानावटी क़ॉलेज ऑफ आर्किटेक्चर

उत्तेजनार्थ : स. प. ज्युनियर कॉलेज, टिकाराम जगन्नाथ कॉलेज व अण्णासाहेब मगर महाविद्यालय

लक्षणीय सहभाग : सिंबायोसिस क़ॉलेज, एन. सी. एल. ज्युनिअर क़ॉलेज व पी. व्हि. जी. इंजिनियरींग कॉलेज

स्पर्धेचे परिक्षक म्हणून व्हि. पी. कुलकर्णी, मंजिरी दामले आणि निनाद पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धेचे यशस्वी संयोजन सुवर्णा भांबुरकर, नयनीश देशपांडे, अर्जुन नाटेकर यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: