Sunday, October 25, 2026
Latest NewsPUNE

दलीत महासंघाच्या पुणे शहराध्यक्षपदी रवींद्र जाधव यांची निवड

पुणे ” दलीत महासंघ च्या पुणे शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जाधव यांची निवड करण्यात आली आहे .त्यांना निवडीचे पत्र दलीत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी दिले आहे .जाधव हे गेल्या 15 वर्षा पासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य करीत आहेत .त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊनच त्यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे .दलीत महासंघ गेल्या कित्येक वर्षापासून राज्यभर दलितांच्या विविध प्रश्नांसाठी कार्य करीत आहे .पुणे शहराच्या अध्यक्षपदी जाधव यांची निवड झाल्याने विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले आहे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading