Sunday, October 25, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मोदीं कडून पंतप्रधान पदाशी’ प्रतारणा..! मुंबईचा ‘सरकारी दौरा खर्च’ निवडणुक आयेगाने, भाजप कडुन वसुल करावा.. काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी


मुंबई : “निवडणुक आयोगाकडे पंतप्रधानांना विचारण्याची क्षमता आहे काय..? या सर्वोच्च न्यायालयाने’ नुकत्याच व्यक्त केलेल्या अपेक्षे प्रमाणे, पंतप्रधान मोदींच्या सरकारी खर्चातील, मुंबई – दौऱ्यास आक्षेप घेणे गरजेचे असून, मुंबई-दौरा खर्च, भाजप कडुन वसुल करण्याचे आदेश निवडणुक आयोगाने भाजप’स द्यावेत.. अशी मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!

देशाचे प्रधानसेवक मा मोदीजी, हे “पंतप्रधान पदाच्या (कोणालाही फेवर न करता, विकासाच्या धोरणात सर्वांशी समान बुध्दीने काम करण्याच्या) शपथेचा” सतत भंग करीत असल्याचा आरोप देखील काँग्रेसने केला..!
मोदीजी स्वतःस देशाचे प्रधानसेवक व चौकीदार म्हणवतात, मात्र ‘पंतप्रधान पदशपथेचा’ ते सतत भंग करीत, विकासात मात्र भाजप समर्थक भुमिका घेतात, जाहीर बोलतात हे त्यांचे वागणे असंवैधानिक आहे. केवळ निवडणुक काळातच नव्हे तर सतत सदा – सर्वकाळ पंतप्रधान ऐवजी ‘भाजप चे प्रधान प्रचारक’ म्हणूनच ते देशभर सरकारी खर्चाने वावरतात. सरकारी खर्चाने होणाऱ्या ‘विकास प्रकल्पांच्या ऊदधाटन प्रसंगी’ देखील केवळ स्वपक्षाच्या प्रचाराचे ढोल बडवत.. “राज्यात व स्थानिक मनपा”त देखील स्वपक्ष भाजप’ची सत्ता आली.. तरच विकास होईल हे प्रत्यक्ष सांगणे, एक प्रकारे जनतेस घमकावणे आहे..! पंतप्रधान पदावरील व्यक्तीने असे सतत ‘पक्षीय भुमिकेत राहणे, विकासा बाबत पक्षानुसार भेदभाव करणे या बाबी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पंतप्रधान पदाशी प्रतारणा करण्या जोग्या आहेत..असे वागणे देशाच्या प्रमुख घटनात्मक पदावरील व्यक्तिस अशोभनीय असल्याची टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.. पुर्वीच्या सरकारांनी देशांतील घटनात्मक संघराज्य पध्दतीस अनुसरून प्लॅनिंगकमिशन केले ते घटनेस धरूनच होते. पंच वार्षिक “योजना आयोग”द्वारे विकासांचा अनुशेष भरून निघत होता. केंद्रात वा राज्यात कोणत्याही पक्षाचे / विचारांचे सरकार असले तरी ही.. विकास निधी मिळत होता..!
वास्तविक, २०१४ अखेर, देशात काँग्रेस प्रणीत युपीए सरकार काळांत, तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री मा नरेंद्रजी मोदींना गुजरात मॅाडेल तयार होतांना.. केंद्रात काय त्यांचे डबल इंजिन भाजप सरकार होते काय..? केंद्रातील काँग्रेस प्रणीत युपीए सरकारच्या, योजना आयोगाच्या ‘गुजरात विषयी विना अनुकुल भुमिकेमुळे वा विना सहकार्या शिवायच कां.. व्हायब्रंट गुजरात झाला.. हे मोदी साहेब सोईस्कर विसरले काय..? असा सवाल ही काँग्रेस प्रवक्त्यांनी विचारला..!
त्या वेळी देखील पुर्वीचे पंतप्रधान विकास प्रकल्पांच्या ऊदधाटनांस विविध राज्यात जात असत.. त्यावेळी केंद्राने काय मदत केली ते अभिमानाने सांगत असत.. परंतू राज्यात आमच्याच पक्षाचे डबल इंजिन सरकार आल्यासच विकास होईल.. असे तेथील राज्यातील जनतेस एक प्रकारे
धमकावत नसत.. असे खडे बोल ही काँग्रेस राज प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading