Wednesday, August 26, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

आगामी लोकसभा निवडणूक जे. पी. नड्डा याांच्या नेतृत्त्वातच भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आगामी लोकसभा निवडणूक आणि १० राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूका भारतीय जनता पार्टिचे राष्ट्रीय अध्यभ जे. पी. नड्डा यांच्याच नेतृत्त्वात लढण्याचा धोरणात्मक निर्णय मंगळवारी घेण्यात आला.

नड्डा यांचा भाजपाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढविण्यावर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने शिक्कामोर्तब केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या मुदतवाढीची घोषणा केली. नड्डा यांचा कार्यकाळ वाढविण्याचा प्रस्ताव केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडला होता. राष्ट्रीय कार्यकारिणीने त्यावर बहुमताने मंजुरी दिली.

यापूर्वी नितीन गडकरी अध्यक्ष असताना, संघनेतृत्वाच्या इच्छेनुसार पक्षाध्यक्षांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत भाजपने घटनादुरुस्ती केली होती. त्याचा फायदा आता नड्डा यांना अनपेक्षितरित्या झाला आहे. पक्षाने नड्डा यांच्या नेतृत्वाखाली देशभर १२० निवडणुका लढवल्या. त्यापैकी ७३ ठिकाणी भाजपाने विजय मिळविला. सोबतच या कार्यकाळात भाजपाने गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आणि गोवा राज्यांमध्ये सत्ता राखली.

पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत दुस-या दिवशी या मुदतवाढीला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला. नड्डा यांना जून २०१९ मध्ये कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले. यानंतर २० जानेवारी २०२० ला त्यांना पूर्णवेळ अध्यक्ष बनवण्यात आले.

दरम्यान, माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि अमित शहा यांच्यानंतर सलग दुस-यांदा सत्ता मिळवणारे ते चौथे नेते ठरले आहेत. मधल्या काळात राजनाथ सिंह हे देखील दोनदा पक्षाचे अध्यक्षही झाले, पण त्यांचा कार्यकाळ सातत्यपूर्ण नव्हता. तसेच आगामी काळात २०२३ मध्ये ९ राज्ये आणि १० विधानसभांसह २०२४ ला लोकसभा निवडणूक होत आहे. त्यात नड्डा यांच्याकडेच पक्षाची राष्ट्रीय धुरा आल्याने त्यांच्याच नेतृत्त्वाखाली या निवडणूका लढविल्या जाणार हे स्पष्ट झाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading