खेळण्याच्या बहाण्याने बोलावून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
पुणे : खेळण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तेरा वर्षाच्या अल्पावयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वानवडी परिसरात घडली आहे. संबंधीत अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी 19 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पिडीत मुलगी दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. खेळण्याच्या बहाण्याने घरी बोलावून या आरोपीने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. हा सगळा प्रकार जानेवारी ते जून 2022 दरम्यान घडला आहे. काही दिवसांपूर्वी पिडीत मुलीच्या पोटात दुखायला लागल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले. यावेळी तपासण्या केल्या असता पिडीत मुलगी 28 आठवड्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
दरम्यान, पिडीत मुलीच्या आईने सादर प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
