fbpx
Friday, April 26, 2024
BusinessLatest News

येस बँकेतर्फे अल्ट्रा एचएनआय ग्राहकांसाठी येस प्रायव्हेट डेबिट कार्ड लाँच

मुंबई  – येस बँकेने मास्टरकार्डसह भागिदारीत बँकेच्या अल्ट्रा हाय नेट वर्थ इंडिव्हिज्वल (युएचएनआय) ग्राहकांसाठी येस प्रायव्हेट डेबिट कार्ड लाँच केले आहे. सर्वोत्तम वैशिष्ट्ये आणि प्रवास, स्वास्थ्य, जीवनशैली या व अशा इतर प्रकारचे विविध फायदे देणारे हे नवे कार्ड उच्चभ्रू व्यावसायिक व उद्योजकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

बँकेने मास्टरकार्ड प्रीमियम वर्ल्ड एलाइट प्लॅटफॉर्म या युएचएनआय ग्राहकांना सेवा देणाऱ्या सिग्नेचर ग्लोबल प्रोग्रॅमअंतर्गत हे कार्ड लाँच केले आहे. यामुळे या प्लॅटफॉर्मवर डेबिट कार्ड लाँच करणारी येस बँक ही आशिया पॅसिफिकमधील पहिली बँक ठरली आहे.

या लाँचविषयी येस बँकेच्या रिटेल बँकिंग विभागाचे जागतिक प्रमुख श्री. राजन पटेल म्हणाले, ‘येस बँकेमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या सातत्याने विकसित होत असलेल्या गरजा व महत्त्वाकांक्षा जाणतो आणि म्हणून त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक सुविधा तयार करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. येस प्रायव्हेट डेबिट कार्ड लाँच करून आम्ही बँकेच्या कार्ड्सची श्रेणी अधिक विकसित केली आहे. हे कार्ड येस प्रायव्हेट ग्राहकांना आमच्या विस्तृत नेटवर्कच्या मदतीने जागतिक दर्जाची वैशिष्ट्ये मिळवून देईल. नवे डेबिट कार्ड ग्राहकांना प्रवास, स्वास्थ्य, जीवनशैली आणि लक्झरी अशा विविध प्रकारचे लाभ तसेच बँकिंगचा दर्जेदार अनुभव मिळवून देईल.’

मास्टरकार्डच्या दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष  गौतम अगरवाल म्हणाले, भारतातील उच्चभ्रू नागरिकांचा वर्ग वेगाने वाढत आहे आणि महामारीनंतर त्यांच्या गरजा व महत्त्वाकांक्षा लक्षणीय प्रमाणात विकसित झाल्या आहेत. आशिया पॅसिफिकमधील पहिले वर्ल्ड एलाइट डेबिट कार्ड लाँच करण्यासाठी येस बँकेसह भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे अल्ट्रा- अफ्युलंट ग्राहकवर्गाला नव्या सुविधा तसेच विविध प्रकारचे लाभ उपलब्ध होतील. येत्या काळात अशा प्रकारच्या उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ होणार असून त्यादिशेने पहिले पाऊल टाकताना आम्हाला आनंद होत आहे.

येस प्रायव्हेट डेबिट कार्डामध्ये युएचएनआयसाठी आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आली असून त्यात खासगी जेट, एयरपोर्ट लिमो, शॉफर्ड कार सेवा, बुकिंग, डायनिंग, स्पा, मोफत गोल्फ सेशन्स आणि प्रशिक्षण अशा प्रकारच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी ओबेरॉय हॉटेल्स अँड रिसॉटर्सची ई- गिफ्ट असे असामान्य अनुभव घेण्यासाठी 24X7 लाइफस्टाइल कॉन्सियर्ज, आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानतळावरील लाउंज प्रवेश यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading