Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ मालिकेत गुरुशिष्याची जोडी मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे!

सोनी मराठी वाहिनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. आता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’, असं या मालिकेचं नाव आहे आणि ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल झाली आहे. वेगळ्या विषयांच्या आणि धाटणीच्या मालिका आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात. ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’ या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातले विनोदी अभिनेते या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. सर्वांचे आवडते आणि लाडके मकरंद अनासपुरेही या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

मालिकेत एक विशिष्ट जोडी पाहायला मिळणार आहे. मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे ही गुरुशिष्यांची जोडी ह्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. हे दोघेही दिग्गज अभिनेते आहेत. ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे…’ या मालिकेत दिलीप घारे हे मकरंद अनासपुरे यांच्या वडिलांचा भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. दिलीप घारे हे माझे अभिनयातले गुरू आहेत, असं मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं. अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात दिलीप घरे यांनी मकरंद अनासपुरे यांना अभिनय शिकवला आणि आता हे दोघे दिग्गज आपल्याला एकाच मालिकेत दिसणार आहेत. त्यांची जुगलबंदी पाहण्यासारखी आहे. वडील आणि मुलगा यांची ही मराठवाड्यातली सुंदर जोडी आपल्याला पाहता येणार आहे. याबद्दल मकरंद अनासपुरेही उत्सुक आहेत.

पाहायला विसरू नका, नवी मालिका – ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’, गुरुवार ते शनिवार रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading