भीमरावांचा पाण्याबाबत भेदभावाला खंबीरपणे विरोध
पाण्याबाबत मानवाच्या हक्काशी संबंधित आणखी एका महत्त्वपूर्ण समस्येला दाखवत एण्ड टीव्हीवरील मालिका ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्बेडकर’मधील आगामी एपिसोडमध्ये तरूण भीमराव (अथर्व) त्याच्या समुदायाला सामना कराव्या लागणाऱ्या भेदभावाविरोधात संघर्ष करताना पाहायला मिळणार आहे, जेथे त्यांना पाणी घेण्यास नाकारण्यात येते. शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे आवश्यक असण्यासोबत मुलभूत गरज आहे, तरीदेखील नरोतम (विक्रम द्विवेदी) व प्रचंड देव जी (गोविंद खत्री) यांच्यासह डेव्हिड (ब्रिटीश अधिकारी) चाळीतील रहिवाशांना प्रवेश प्रतिबंधित करण्यासाठी योजना आखतात. भीमराव याविरोधात उभे राहतात आणि सर्वांना पाणी उपलबध करून देण्यासाठी लढा देतात. या एपिसोडबाबत सांगताना तरूण भीमरावांची साकारणारा अथर्व म्हणाला, ‘‘पाणी ही माणसाची मुलभूत गरज आहे आणि ते नाकारणे ही मानवतेविरोधातील क्रूर कृत्य आहे. विद्यमान कथानक पाणी संकटावर आणि भीमरावांनी या भेदभावाविरोधात लढा देण्यासाठी त्यांच्या समुदायाला केलेल्या मदतीवर लक्ष केंद्रित करते. बाबासाहेब स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे मोठे पुरस्कर्ते होते. पाण्याची असमानता हा त्यांच्या सामाजिक अन्यायाविरुद्धच्या लढ्याचा एक महत्त्वाचा पैलू होता. त्यांनी या दिशेने अनेक सक्रिय चळवळी सुरू केल्या, जसे १९२७ मध्ये ‘महाड सत्याग्रह’ नावाचा सार्वजनिक पाणी वापरण्याचा हक्क सांगण्यासाठी अहिंसक प्रतिकार, जो आता भारतात सामाजिक सक्षमीकरण दिन म्हणून साजरा केला जातो.’’
अधिक जाणण्यासाठी पाहत राहा ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्बेडकर’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!
