Thursday, May 28, 2026
Latest NewsSports

‘अनिकेत वर्टी करंडक’ ट्वेन्टी-२० अजिंक्यपद १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !!

पुणे :  क्रिक् चॅलेंजर्स तर्फे ‘अनिकेत वर्टी करंडक’ ट्वेन्टी-२० अजिंक्यपद १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १८ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत बापूसाहेब शेलार क्रिकेट मैदान (ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी), येवलेवाडी येथे होणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक नितीन सामल व नंदकिशोर कुमावत आणि अश्‍विनी कुमावत यांनी सांगितले की, नवीन वर्षामध्ये क्रिक चॅलेंजर्स तर्फे पहिल्याच महिन्यामध्ये या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. मुलांच्या १२ वर्षाखालील वयोगटासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १२, १४, १६, १९ या वर्षाखालील मुलांच्या वयोगटातील सामने आयोजित केल्यामुळे मुलांना लहान वयातच व्यावसायिक आणि स्पर्धात्मक खेळांचे महत्व कळून येते. अशा स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर मुलांना अधिक आत्मविश्‍वास मिळतो आणि त्यांना पुढच्या कारकिर्दीसाठी ते अधिक महत्वाचे ठरते. मुलांसाठी अशा स्पर्धा सतत आयोजित करण्याचा आमचा मानस असल्याचे कुमावत यांनी स्पष्ट केले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरासह नाशिक जिल्ह्यातील तसेच संभाजीनगर (औरंगाबाद), पनवेल येथील प्रत्येकी एक संघ असे एकूण ८ संघ या आंतरक्लब स्पर्धेत सहभागी झाले आहे. स्पर्धेचा प्रत्येक सामना हा २०-२० षटकांचा असणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना हा २५-२५ षटकांचा होणार आहे. स्पर्धेचे सामने गटसाखळी आणि बाद फेरीमध्ये होणार आहेत.
या स्पर्धेत ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिमखाना आणि संभाजीनगरचा एमजीएम क्रिकेट अ‍ॅकॅडमी, पनवेल क्रिकेट अ‍ॅकॅडमी, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी, युनायटेड क्रिकेट अ‍ॅकॅडमी, वीरंगन क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि परंदवाल क्रिकेट अ‍ॅकॅडमी या ८ निमंत्रित संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे, नंदकिशोर कुमावत यांनी सांगितले.
व्हाईट चेंडूवर होणार्‍या या स्पर्धेत सहभागी ८ संघ दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. गटसाखळी फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक आणि ५१ हजार रूपये तर, उपविजेत्या संघाला करंडक आणि २५ हजार रूपये मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, उदयोन्मुख खेळाडू याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ही वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर आणि फायटर ऑफ द मॅच अशी पारितोषिके देण्यात आहेत.
स्पर्धेचे उद्घघाटन एस. कुदळे कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक नीरज कुदळे आणि उद्योगपती स्वप्नील शेलार, अनिकेत वर्टी यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनाचा सामना ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी आणि पनवेल क्रिकेट अ‍ॅकॅडमी या दोन संघांमध्ये होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading