Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी; कार्यकर्ते आक्रमक

मुंबई : राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली आहे. हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील बंगल्यावर, कोंढवा येथील मुश्रीफ यांच्या मुलीच्या घरावर, कार्यालयावर ही छापेमारी सूरी आहे. तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या घरात देखील छापेमारी सुरू आहे. दरम्यान, मुश्रीफ यांच्यावर कारवाई होत असल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी एकाच गर्दी केली आहे. त्यावर मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

ईडीने मुश्रीफ यांचा मुलगा आणि मुलीच्या घरावरही छापे टाकले आहे. पुण्यात ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या चंद्रकांत गायकवाड यांच्यावर छापे टाकले आहे. कोंढवा,कोरेगाव पार्क आणि गणेशखिंड रोडवर छापेमारी सुरू आहे. चंद्रकांत गायकवाड हे मुश्रीफांच्या भागीदार आहे.

 कथित साखर कारखान्याच्या घोटाळ्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले आहेत. याच प्रकरणी आज सकाळपासून कोल्हापूर आणि पुण्यामध्ये छापेमारी सुरू केली आहे. दरम्यान, आपासाहेब नलवडे कारखान्यात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाचे हे प्रकरण आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच हे आरोप फेटाळून लावले आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading