Saturday, August 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील गलिच्छ राजकारण थांबवाव – खासदार सुप्रिया सुळे

पुणे:अभिनेत्री उर्फी जावेद व भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील आरोप- प्रत्यारोप वाढत असून हे थांबले पाहीजेत.थांबविण्याची सुरवात आम्ही आमच्यापासून पक्षापासून करतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा”, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलतानाकेले आहे. तसेच हे गलिच्छ राजकारण थांबवाव, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्टीच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘वेध भविष्याचा, विचार राष्ट्रवादीचा’ आयोजित एकदिवसीय शिबिर आयोजित केले होते. . शिबिरानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद पत्रकारांशी साधला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या,गेली अनेक आठवडे राज्यभर संधी मिळेल तिथे मी हेच सांगतेय हे थांबवा. माझी सर्व पक्षांना विनंती आहे. हे आरोप- प्रत्यारोप थांबले पाहीजेत. अनेक पक्षांच्या नेत्यांवर आरोप- प्रत्यारोप होत आहेत. अनेक महिन्यांपासून मी पाहत आहे. महिलांना मातेसन्मान जिथे होतो, तिथे हे घडतंय. प्रत्येकाच्या घरात मुली आहेत. मूलांसोबत कशा बातम्या बघायच्या. हे महाराष्ट्राचं जनरल नॉलेज आहे का? असा सवाल देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
बेळगाव राज्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री राज्याच्या विरोधात बोलतात. आपले मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. गृहमंत्री अमित शाह यांना आम्ही महाविकास आघाडीचे खासदार भेटलो. त्यानंतर मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांना दिल्लीला बोलावले. शाह यांनी बेळगाव विषय कोर्टात काय होते ते बघू. याबद्दल आम्ही त्यांचे जाहिरपणे आभार मानतो. शाह बोलले तरी, कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी आरोप केले. मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री बोटचेपेपणाची भूमिका घेतात. यामुळे महाराष्ट्राचा विरोधात षड्यंत्र अशी शक्यता आहे, असे वाटते”, असं सुळे म्हणालाय आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक असल्याचा उल्लेख विधानसभेत केला. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. भाजपाने आक्रमक पवित्रा घेत राज्यभर आंदोलन केले.
सुप्रिया सुळे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अनेक वेळा मला दादाच मुख्यमंत्री असल्याच वाटत असल्याचं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading