स्कोडा ऑटो इंडियाकडून वर्ष २०२२ ची भारतातील ‘बिगेस्ट इअर’ म्हणून नोंद
मुंबई : स्कोडा ऑटो इंडियाने २०२१ च्या तुलनेत १२५ टक्क्यांच्या वाढीची नोंद करत प्रबळ गतीसह वर्ष २०२२ ची सांगता केली. २०२१ मध्ये विक्री करण्यात आलेल्या २३,८५८ कार्सच्या तुलनेत कंपनीने २०२२ मध्ये ५३,७२१ युनिट्सच्या वार्षिक विक्रीची नोंद केली. डिसेंबर २०२१ मध्ये विक्री करण्यात आलेल्या ३,२३४ युनिट्सच्या तुलनेत डिसेंबर २०२२ मध्ये ४,७८८ युनिट्सची विक्री करण्यात आली, ज्यामध्ये मासिक विक्री आकारमानात ४८ टक्क्यांची वाढ झाली.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रॅण्ड संचालक पीटर सोलक म्हणाले, ‘‘टीम म्हणून आमचा वर्ष २०२२ची सांगता उच्च स्तरावर करण्यावर फोकस होता आणि आम्हाला आमचे ध्येय संपादित करण्याचा अभिमान वाटतो. २०२२ आमच्यासाठी संस्मरणीय वर्ष राहिल, कारण आम्ही मागील वर्षाच्या तुलनेत आमच्या विक्रीमध्ये दुप्पट वाढ केली, आम्ही मासिक व तिमाही विक्री रेकॉर्डस् गाठले, आम्ही अधिक टचपॉइण्ट्ससह आमचे नेटवर्क विस्तारित केले. तसेच आमच्या ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या आमच्या स्लाव्हिया सेदानने प्रिमियम मध्यम आकाराच्या सेदान श्रेणीवर मोठा भर दिला आहे आणि कुशक एसयूव्हीला आधुनिक ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्ट्समध्ये संपूर्ण ५-स्टार्स मिळाले आहेत, तसेच ती अधिकृतरित्या भारतातील सर्वात सुरक्षित कार आहे. या यशाचे श्रेय आमच्या टीम्स, आमचे डीलर भागीदार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या चाहत्यांना व ग्राहकांना जाते, ज्यांनी ब्रॅण्ड स्कोडावर दाखवलेले प्रेम व निष्ठेमुळे हे यश मिळवता आले आहे आणि हे वर्ष आमचे आतापर्यंतचे बिगेस्ट इअर ठरले आहे.’’
जानेवारी ते डिसेंबर २०२२ पर्यंत स्कोडा ऑटो इंडियाने एकूण ५३,७२१ युनिट्सची विक्री केली, जेथे २०२१ मध्ये विक्री करण्यात आलेल्या २३,८५८ कार्सच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली. आपल्या इंडिया २.० मनसुब्याला अधिक उंचावर घेऊन जात स्कोडा ऑटो इंडियाने २२५ सेल्स व सर्विस टचपॉइण्ट्सच्या लक्ष्याला पार केले आहे आणि आज भारतभरात जवळपास २४० ग्राहक टचपॉइण्ट्स आहेत. हे विस्तारीकरण ग्राहकांशी संलग्न असण्यासोबत आपले नेटवर्क विस्तारित करत इंडिया २.० च्या ग्राहक-केंद्रित व ग्राहक समाधानासंदर्भात गती राखण्याच्या कंपनीच्या उद्देशाशी संलग्न आहे.
तसेच स्कोडा ऑटो इंडियाने क्रांतिकारी सर्वोत्तम व इंटरअॅक्टिव्ह तंत्रज्ञानांसह आपल्या शोरूम्सना पूर्णपणे डिजिटाइज केले आहे. हे तंत्रज्ञान कंपनीच्या ग्राहकांसाठी कार खरेदी करण्याचा अनुभव पुनर्परिभाषित करतात.
यापूर्वी स्कोडा कुशकला आधुनिक ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम क्रॅश टेस्टमध्ये संपूर्ण ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले. कुशक सर्वात सुरक्षित कार असण्यासोबत प्रौढ व्यक्ती व मुलांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण ५-स्टार्स मिळालेली कार आहे. स्लाव्हिया प्रिमियम मध्यम आकाराच्या सेदन श्रेणीच्या दोन-अंकी वाढीमध्ये सहाय्यक राहिली आहे.
स्कोडा ऑटो इंडिया उद्योगामधील प्रमाणित ३-वर्षांच्या वॉरंटीच्या तुलनेत ४-वर्षे/१००,००० किमी वॉरंटीसह उद्योगामध्ये अग्रस्थानी आहे. या वारंटीव्यतिरिक्त प्रमाणित ४-वर्षांचे पीस ऑफ माइंड पॅकेज, तसेच कुशक व स्लाव्हियासठी कॉम्प्लीमेंटरी स्टँडर्ड मेन्टेनन्स पॅकेज आहे. तसेच विद्यमान व नवीन ग्राहकांना नववर्ष साजरे करण्याचा आनंद देण्यासाठी कुशक व स्लाव्हियाचे फायनान्शियल बेनीफिट्स, लॉयल्टी बोनस व एक्सचेंज इन्सेंटिव्ह्ज आहेत.
