Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

पुणे महानगर पालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला यश

पुणे : 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्या सुरक्षारक्षकांना कामावर काढून टाकण्याचा घाट पुणे महानगर पालिकेच्या प्रशासनाने नेमलेल्या कंत्राटदाराने घातला. त्यामुळे पुणे महानगर पालिकेच्या 300 पेक्षा जास्त जास्त कामगाराना घरी बसाव लागलं.

याबाबत राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा चालू होता. प्रशासन या निर्णयाबाबत कुठलीही भूमिका घेत नव्हत. त्यामुळे 2 जानेवारी 2022 रोजी पुणे मनपा मुख्य गेट समोर सुरक्षा रक्षक आमरण उपोषणाला बसले होते. पुणे जिल्हा सुरक्षा मंडळ मार्फत 45 वयाची असलेली अट बेकायदेशीर आहे याबाबत पत्र देखील महानगर पालिका प्रशास नाला दिले होते. कुठलाही निर्णय होत नसल्यामुळे शेवटी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन संघटने मार्फत निवेदन देण्यात आले. या भेटी दरम्यान आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त बिनवडे, कुणाल खेमनार ही उपस्थित होते. पालकमंत्रीनी आयुक्तांना याबाबत आदेश दिले की कुठल्याही कामगाराला 45 वयाची अटीबाबत घरी बसू दिलं जाणार नाही.
संघटनेचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, प्रतिनिधी विजय पांडव, बाळू दांडेकर, जान्हवी दिघे, अरविंद आगम उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading