fbpx
Friday, December 8, 2023
Latest NewsPUNE

धायरीकरांच्या वतीने प्राणाची बाजी लावणाऱ्या पोलीसांचा सन्मान

पुणे:प्राणाची बाजी लावून कोयत्याने हल्ला करणाऱ्या गुंडाना जेरबंद करणारे सिंहगडरोड पोलिस ठाण्याचे पोलिस जवान अक्षय इंगवले व धनंजय पाटील यांचा धायरीकर नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
खडकवासला विधानसभा काँग्रेस व धायरी बंधुत्वा ग्रुपच्या वतीने सन्मानचिन्ह,शाल पुष्पगुच्छ देऊन इंगवले व पाटील यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील व बंधुता ग्रुपचे अध्यक्ष मिलिंद पोकळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

बुधवारी वडगाव आंबेगाव, सिंहगड कॉलेज भागात दोन गुंड सैरावैरा कोयत्याने हल्ला करत होते. परिसरात त्यांनी मोठी दहशत माजवली. दुकाने, वाहनांची तोडफोड करत दिसेल त्या व्यक्तीवर हल्ला करत होते. जिवाच्या आकांताने महिला मुले सैरावैरा धावत होती. हल्ल्यात विद्यार्थ्यासह अनेक जण जखमी झाले‌ . त्यावेळी अक्षय इंगवले व धनंजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत प्राणाची बाजी लावून दोघांना जेरबंद केले.त्यामुळे जिवीतहानी टळली.

श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले, सिंहगडरोड परिसराला शिवकालीन शौर्याचा वारसा आहे. पोलिस जवान अक्षय इंगवले व धनंजय पाटील हे निधड्या छातीने जनतेचे देवदुत होऊन पुढे आले. हल्लेखोर गुंडांना जेरबंद करुन सिंहगड च्या पोलिस जवानांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.आहेत. गुंडांची दहशत मोडून काढाण्यासाठी समाजाने पोलिसांचे बळ, मनोधैर्य वाढवले पाहिजे . ऋषिकेश पोकळे, राजेश पोकळे, सनी गायकवाड यांनी संयोजन केले.

Leave a Reply

%d