fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENTLatest News

अभिनेत्री कुंजिका काळविंट साकारणार खलनायिका

मनोरंजनाच्या प्रवाहात दर्जेदार मालिका सादर करत स्टार प्रवाह वाहिनीने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. नव्या वर्षात नव्या मालिकेची भेट प्रेक्षकांना देण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. प्राईम टाईम मध्ये दाखवल्या जाणाऱ्या सर्वच मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच प्रेक्षकांची दुपारही मनोरंजनाने परिपूर्ण करण्याचा स्टार प्रवाहचा प्रयत्न आहे. मुरांबा आणि लग्नाची बेडी या दोन मालिकांना मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादानंतर स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका शुभविवाह. बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट म्हणजे शुभविवाह ही मालिका. अभिनेत्री कुंजिका काळविंट या मालिकेत पौर्णिमा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने कुंजिकाची नव्या वर्षाची दमदार सुरुवात होणार आहे.

भूमीच्या सावत्र बहिणीची म्हणजेच पौर्णिमा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री कुंजिका काळवीट म्हणाली, ‘सगळीकडे लग्नाचा छान माहोल आहे आणि अश्यातच आमची शुभविवाह मालिका भेटीला येतेय. मी गेले वर्षभर एका चांगल्या कथानकाच्या आणि चांगल्या पात्राच्या शोधात होते. शुभविवाह ही मालिका म्हणजे माझी स्वप्नपूर्ती म्हणता येईल. या मालिकेच्या निमित्ताने नव्या वर्षाची दमदार सुरुवात होणार आहे. पौर्णिमा या पात्राकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. मी मालिकेत खलनायिका साकारणार याचा अंदाज प्रेक्षकांना पहिला प्रोमो पाहूनच आला असेल.

खरतर नकारात्मक भूमिका साकरताना खूप कस लागतो. मालिकेत हे पात्र पुढे काय करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. मालिकेत सगळे दिग्गज कलाकार आहेत. भूमी आणि मी मालिकेत सावत्र बहिणी आहोत. मालिकेत आमचं पटत नसलं तरी पडद्यामागे मात्र आमची छान गट्टी जमली आहे. रुम शेअर करण्यापासून ते अगदी एकमेकांची मत जाणून घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टी खूप आपलेपणाने करतो. या मालिकेमुळे मला एक छान मैत्रीण मिळाली आहे असंच म्हणायला हवं. प्रत्येक पात्र आपली एक छाप सोडत असतं. पौर्णिमा हे पात्र साकारणँ एक अभिनेत्री म्हणून नक्कीच आव्हानात्मक आहे. स्टार प्रवाहसोबत माझी पहिली मालिका आहे त्यामुळे खूपच उत्सुकता आहे. तेव्हा १६ जानेवारीपासून दुपारी २ वाजता पाहायला विसरु नका नवी मालिका शुभविवाह फक्त स्टार प्रवाहवर.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading