Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘घरात बायको, बाहेर बॉस’ कसा असेल अप्पी आणि अर्जुनचा नवा प्रवास?

अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही.पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणाऱ्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे अप्पी आमची कलेक्टर. ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर आली आहे. मालिकेत रोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहेत. ही  मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. अप्पी अर्जुनचं लग्न झाल्यानंतर मालिकेत लवकरच एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तो म्हणजे अर्जुन अप्पीला कलेक्टर बनवण्यासाठी तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहून तिला प्रोत्सहन देणार आहे, आणि त्याचा ठाम विश्वास आहे अप्पी नक्की कलेक्टर बनणार.

या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरतोय, येणाऱ्या काही भागात आपण पाहणार आहोत अप्पी कलेक्टर झाल्यावर ‘घरात बायको, बाहेर बॉस’ कसा असेल हा नवा प्रवास?  हे पाहण्यासाठी पाहायला विसरू नका “अप्पी आमची कॉलक्टर” सोमवार ते शनिवार संध्या ७ वाजता  फक्त आपल्या झी मराठीवर.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading