fbpx

सफायर फूड्स इंडिया लिमिटेडने बावधन येथे उघडले २२ वे पिझ्झा हट स्टोअर

पुणे : पिझ्झा हट ही यमची उपकंपनी व ब्रँड्स असुन (NYSE: YUM) सफायर फूड्स ही यमच्या सर्वात मोठ्या फ्रँचायझी पैकी एक आहे. संपूर्ण भारत, श्रीलंका आणि मालदीवमध्ये ६५० हून अधिक केएफसी, पिझ्झा हट रेस्टॉरंट्स यशस्वीपणे चालवण्याचा ट्रॅक रेकॉर्ड असलेले त्यांचे हे ब्रँड्स आहेत. पिझ्झा हटचा भारताच्या पश्चिम भागात झपाट्याने विस्तार होत आहे आणि आज पुण्यातील बावधन येथील पिझ्झा हटचे सीईओ विक्रांत वोहरा यांच्या नेतृत्वाखाली सॅफायर फूड्स इंडिया लिमिटेडच्या मालकीच्या २२ व्या पिझ्झा हट स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले.

मोहोळ कन्स्ट्रक्शनचे संचालक आणि या हेरिटेज प्रॉपर्टीचे मालक विजय मोहोळ यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले. यावेळी किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील, अल्पना वर्पे आणि जॉन चेलिया रिजनल हेड – पिझ्झा हट (पश्चिम आणि मध्य) उपस्थित होते. पिझ्झा हट हे जगातील सर्वाधिक मान्यताप्राप्त पिझ्झा रेस्टॉरंट बनले आहे, जे १०० हून अधिक देशांमध्ये १८००० हून अधिक रेस्टॉरंट चालवत आहे. पिझ्झा हट हा भारतातील सर्वात पसंतीचा पिझ्झा ब्रँड आहे, त्यांच्याकडे सर्वात फ्रेश, चवदार आणि वाजवी दरातील पिझ्झा उपलब्ध असतात. पिझ्झा हट इंडियाला ईटी ब्रँड इक्विटीने १३ वर्षांपासून ‘सर्वात विश्वसनीय फूड सर्व्हिस ब्रँड’ म्हणून मान्यता दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: