fbpx

भाजपच्या वतीने परभणी विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार

परभणी : शहरातील कौस्तुभ मंगल कार्यालयात भाजपा परभणी महानगरच्या वतीने परभणी विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मराठवाडा भाजपा संघटनमंत्री .संजय कौडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.तसेच याप्रसंगी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष आनंदराव भरोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी, राजेश देशपांडे, संघटन सरचिटणीस अँड.एन.डी.देशमुख,तालुकाध्यक्ष संदिप जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
देशात पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व राज्यात मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार हे सर्वसामान्य नागरिकांसाठी शेकडो योजना राबवित आहे. या केंद्र व राज्य सरकारच्या योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रभावीपणे करावे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेने ग्रामपंचायत निकालांमधून भाजप व शिंदे गटाला स्पष्ट कौल दिला आहे. येणाऱ्या काळात राज्य सरकारच्या माध्यमातून निवडून आलेल्या ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त निधी मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

परभणी विधानसभा मतदार संघातील

१) साडेगाव मधील नवनिर्वाचित सरपंच सदाशिवराव नाईक,सदस्य शेषेराव भांगे,कपीलकुमार देवडे,

२) तट्टुजवळा येथील सरपंच नारायणराव कदम,पँनलप्रमुख सदाशिवराव कदम,चेअरमन रवी कदम,सदस्य किशन कदम,ज्ञानदेव कदम,माधव कदम,सु़धाकर कनकुटे,अरुण कदम,बाळासाहेब कदम,सुमित कदम

३) पारवा येथील सरपंच रमेशराव सावळे,सदस्य राजेश कदम,प्रताप सोळंके, संजय बेटकर,नथुराम माळवदे,तुकाराम काकडे,जानकीराम काकडे,छत्रगुण दळवे,बाळासाहेब साबळे

४) रायपूर येथील सरपंच दत्तराव मस्के,पँनल प्रमुख मोकिंदराव मस्के,मधुकरराव मस्के,सदस्य अक्षय मस्के,सुनिल कसबे,नागोराव बनसोडे,लिंबाजी बनसोडे,वसंतराव ढोले,अंगद मस्के,

५) कौडगाव येथील सरपंच दिलीप पौंढे,ग्रामपंचायत सदस्य अंगद पौंढे, राजेश रेंगे,बाळासाहेब पोंढे, विजयराव पोंढे,

६) आसोला येथील सरपंच उमाकांत भरोसे,ग्रामपंचायत सदस्य बाळू जावळे,धारोजी नावळे,रुखमाजी मकासरे,पांडुरंग जावळे, हरिभाऊ भरोसे, बालासाहेब जावळे,रामा जावळे, शिवाजी भरोसे,विनायक भरोसे,निलेश भरोसे,पुरभाजी जावळे,व्यंकटी जावळे,प्रल्हादराव जावळे,नारायण जावळे,रंगनाथ भरोसे

७) टाकळी कुं.येथील सरपंच सुशीलाबाई शंकरराव बोराडे यांचे चिरंजीव परमेश्वर बोराडे,ग्रामपंचायत सदस्य,सोपान सामाले,डिगंबर बुलबुले,उमेश घोलप,प्रमोद देशमुख,नितिन सामाले,प्रशांत शेंडगे,श्रीकांत देशमुख तसेच संतोष सामाले राजेश देशमुख,राम नवघरे
आदी सरपंच,पँनलप्रमुख,ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांचे सत्कार करण्यात आले.

या सत्कार सोहळ्यासाठी परभणी महानगर व विधानसभा मतदार संघातील भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Leave a Reply

%d bloggers like this: