महाविराट मोर्चाला राजकीय रंग देऊ नये -आमदार रोहित पवार
पुणे: महाविकास आघाडी राज्यपालांविरोधात एकवटली असून येत्या 17 डिसेंबरला मुंबईत महाविराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.पोलिसांनी अजूनही या मोर्चाला परवानगी दिलेली नाही. यावरुन एकीकडे पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता असतानाच महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. पण आघाडीच्या काही प्रमुख नेत्यांनी हा मोर्चा काढणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना महाविराट मोर्चाला राजकीय रंग देऊ नये असा इशारा शिंदे फडणवीस सरकारला दिला आहे.
रोहित पवार यांना मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल. याबाबत विचारलं असता ते म्हणाले की विस्तार व्हायला हवं. अनेक लोकांना मंत्री व्हायचं आहे. त्यांच्याच चुरस लागली आहे. विस्तार हा पुढे पुढे होत चाललं आहे. जी 4- 4 खाती आत्ता मंत्र्यांना देण्यात आली आहे. त्यांच्यावर अन्याय होत आहे.
सीमावाद बाबत रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, अमित शाह यांचे अभिनंदन करतो. दोन राज्यांचा वाद आहे, त्याबद्दल बैठक घेतली. सुप्रिया ताई यांच्यासह सगळ्या महविकास आघाडी खासदारांचे यांचे देखील अभिनंदन करतो. मात्र भाजप, शिंदे गट खासदार पुढे आले नाहीत. एक विनंती आहे ते गृहमंत्री आहेत. कर्नाटकमध्ये असलेले मराठी सामाजिक सेवक आहेत. त्यांना अनेक अडचणी येत आहेत, अशी वागणूक त्यांना मिळू नये, अभिव्यक्ती स्वतंत्र आहे. पिवळे काळे झेंडे घेऊन राजकीय आंदोलन करतात. त्यांना शांत केले पाहिजे. हे झाले नाहीतर महाराष्ट्रीयन माणसे शांत बसणार नाहीत. ट्विटर अकाऊंट बद्दल कारवाई करा, पण व्हिडिओ आणि वक्तव्य केले त्याचे काय कर्नाटकचे 4 महिन्यात निवडणुका आहेत. राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी ही मराठी अस्मिता बद्दल खेळले नाही पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
