fbpx

श्रीधर फडके यांच्या गायनाने पुणेकर भक्तीरंगात दंग

पुणे : ओंकार स्वरूपा…रुपे सुंदर सावळा गे माये… ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरू दिसले… बाई मी विकत घेतला श्याम… अशा एकाहून एक सरस रचना सादर करीत संगीतकार व गायक श्रीधर फडके यांनी गायनसेवा केली. मंगल स्वरांचा विस्तृत कालखंड देऊन मराठी संस्कृतीला समृध्द करणाऱ्या बाबूजींची गीते आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात. अशा भक्तीगीतांच्या सादरीकरणाने मठाचा संपूर्ण परिसर भक्तीरंगात न्हाऊन निघाला.

निमित्त होते, नारायण पेठेतील प.प. शिरोळेकर स्वामी महाराज द्वारा संस्थापित आणि प.प.एरंडे स्वामी महाराज द्वारा संवर्धित श्रीमत् जगद्गुरु श्री शंकराचार्य मठातर्फे श्री दत्तजयंती उत्सवाचे. यावेळी सुप्रसिद्ध गायक व संगीतकार श्रीधर फडके यांचा ओंकार स्वरुपा या कार्यक्रमाचे आयोजन आले. सहगायिका शिल्पा पुणेतांबेकर यांनी गायन साथ केली.
यावेळी दीपक मानकर, अमर चक्रदेव, प्रसाद लिमये, किशोर जोशी, ॲड.श्रीकांत कुलकर्णी,
यश रामलिंगे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात देव देव्हा-यात नाही… या बाबूजींनी गायलेल्या व संगीतबद्ध केलेल्या गाण्याने झाली. यानंतर देवाचिये द्वारी उभा क्षणभरी… या संत ज्ञानेश्वर यांच्या रचनेने रसिक भक्तीरसात न्हाऊन निघाले. रुपे सुंदर सावळा गे माये… या गीतातील गरब्याच्या तालावर रसिकांनी देखील ठेका धरला. माता भवानी जगताची जननी… या गीताने गायिका शिल्पा पुणतांबेकर यांनी कार्यक्रमात बहार आणली, सुकन्या जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: