श्री मोरया गोसावी पुरस्कार मगर महाविद्यालयाचे प्रा.नानासाहेब पवार यांना प्रदान
पुणे :.श्री मोरया गोसावी संस्थांनच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार आण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्रा.डॉ.नानासाहेब पवार यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते देण्यात आला .चिंचवड देवस्थान ट्रस्ट श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळा वर्षे ४६१ च्या निमित्ताने दिला जाणारा *श्री मोरया गोसावी पुरस्कार आहे .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री मा श्री गिरीश प्रभुणे,
प्रमुख पाहुणे इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे , मोरया देवस्थानचे मुख्य विश्वस्त माननीय श्री मंदारजी जगन्नाथ देव, जितेंद्र रमेश देव, ह. भ .प आनंद विश्वनाथ तांबे , राजेंद्र उमाप, श्री विनोद पोपटराव पवार तसेच माझी सर्व विश्वस्त, राजकीय सामाजिक सांस्कृतिक, कला,क्रीडा, साहित्य अशा विविध क्षेत्रातील काम करणारे अनेक मान्यवर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आजी माजी, महापौर, सदस्य अनेक भक्त व पुणे शहर व पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
पद्मश्री मा .गिरीश प्रभुणे म्हणाले “ज्या महापुरुषांच्या विचारांचे संस्कार आपल्या भारतीयांच्या मनावर होतात ते जीवनात सदैव प्रेरणा निर्माण करतात .संतांचे वाड्:मय जीवनाचे सार आणि तत्वज्ञान सांगते.विचारवंतांचे,तत्ववेत्यांचे, साहित्यिकांचे वाड्:मय जीवन समृद्ध करते “अशी भावना व्यक्त केली
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्थेत गेली सतरा वर्षे प्रा.डॉ.नानासाहेब पवार अध्यापनाचे काम करीत आहेत . सध्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे पीएच.डी संशोधन केंद्र समन्वयक म्हणून सेवा करत आहे . सध्या या संशोधन केंद्रात महाराष्ट्रातील विविध भागातील विद्यार्थी आहेत . साहित्य आणि समाज,संस्कृती संशोधन आणि अध्यापन अशा विविध क्षेत्रात पवार कार्य करीत आहेत .
प्रा.डॉ.नानासाहेब पवार म्हणाले की , मी प्रामाणिकपणे काम करीत आहे , मनापासून काम केल्याचे चीज झाल्यासारखे वाटले.आणि आपण दिलेला हा पुरस्कार अजून बळ देत जाईल.म्हणून आपले मनपूर्वक आभार ,भविष्यात माझ् होणारे काम ज्ञानदेवांच्या *” टागोरांच्या *”विचाराचे प्रेरणा घेऊन करेन , सज्जनहो हा मिळालेला पुरस्कार माझ्या गेल्यावर्षी या जगाचा निरोप घेऊन आनंताकडे गेलेल्या दिवंगत वडिलांना व त्याच्या स्मृतींना समर्पित करतो अशी भावना पवार यांनी व्यक्त केली .
