fbpx

संदिप कुदळे यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर

पुणे :  चंद्रकांत पाटील यांनी पैठण औरंगाबाद येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील या राष्ट्रीय महापुरूषांविषयी अवमानकारक वक्तव्या केले व त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले. त्याचप्रमाणे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते संदिप कुदळे यांनी देखील त्यांच्या सोशल मिडीयावरती चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा निषेध करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिीडीओ पोस्टचा आक्षेप घेवून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संदिप कुदळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तसेच त्यांच्यावर वारजे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळ आज मा. पोलीस आयुक्त पुणे अमिताभ गुप्ता यांना भेटून निवेदन दिली आणि झालेल्या प्रकरणाची त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली. मा. पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, संदिप कुदळे यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि झालेल्या प्रकरणावर आम्ही लक्ष घालू असे सांगितले. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या सोबत माजी गृहराज्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड, अजित दरेकर, संगीता तिवारी, हनुमंत राऊत, कामगार नेते सुनिल शिंदे, मुख्तार शेख आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

%d bloggers like this: