Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ ‘पुणे बंद’ ला सर्व स्तरातून पाठिंबा…

सर्व जाती-धर्माचे शिवप्रेमी कडकडीत बंद पाळणार…

पुणे – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरून शिवाजी महाराजांची अवहेलना केल्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरतर्फे उद्या मंगळवार दि 13 डिसेंबर 2022 रोजी पुणे बंद आयोजित करण्यात आला आहे तसेच मुक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. केंद्रसरकरने राज्यपाल कोशारी यांची तातडीने हकालपट्टी करावी श्री कोशारी यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी भारतीय जनता पक्षानेही माफी मागावी या मागणीसाठी उद्या मंगळवारी पुणे बंद व मुकमोर्चा आयोजित केला आहे.

उद्या मंगळवारी सकाळी 9-30 वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुक मोर्चास प्रारंभ होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहाल येथे मुक मोर्चाची सांगता जाहीर सभेने होणार आहे.

या मोर्चात छत्रपती उदयनराजे महाराज, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, सौरभ खेडेकर आदी नेते सहभागी होणार आहेत. तसेच सर्वसामाजिक संघटनेचे पदाधिकारी जाहीर सभेतही बोलणार आहेत.

या मुकमोर्चात पुणे शहर व जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळाने या बंदला पाठिंबा दिला आहे तसेच मंडळांचे कार्यकर्ते या मुकमोर्चात सहभागी होणार आहेत त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना, संस्था, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना सर्वस्वी नागरिक स्वयंस्फूर्तीने या बंद व मोर्चात सहभागी होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ मंगळवार दि. 13 डिसेंबर रोजी ‘पुणे बंद’ ला सर्व स्तरातून पाठिंबा स्वतःहून दिला असून या मोर्चा व बंदमध्ये सर्वसामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यापारी, वकील, डॉक्टर, इंजिनियर, कामगार व सर्व जाती धर्माचे शिवप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

तसेंच विविध पक्षाचेही नेते व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत.

अरविंद शिंदे, दीपक मानकर, संतोष शिंदे, बाळासाहेब धाबेकर, विकास पासलकर, बाळासाहेब अमराळे, अंजुम इनामदार, संजय बालगुडे संगीता तिवारी आदींनी पत्रकार परिषदेमध्ये सर्व पुणेकरांना जास्तीत जास्त हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे व पुणे बंद साठी सर्वांनी स्वतःहून पाठिंबा द्यावा आणि मूक मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading