fbpx

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल

पुणे :  काल (दी. 9) पैठण येथील एका कार्यक्रमा दरम्यान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी आज पुण्यातील सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकर या संघटनेच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राज्यात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याबद्दल रोष असतानाच काल चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह सोशल मिडियावर चंद्रकात पाटील यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांना पुण्यातील सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकर या संघटनेने निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे ही तक्रार देण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पुण्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: