fbpx

बिग बॉस मराठी सिझन 4 : राखीचा अवतार पाहून विकासची घाबरगुंडी उडाली …मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरात काल भरलेल्या BB High School मध्ये प्रसादने केलेल्या मिमिक्रीमुळे उडाला मनोरंजनाचा बार… तर अक्षय – प्रसाद मध्ये झाला जोरदार राडा. एका व्यक्तीने काल बिग बॉस मराठीच्या घरातील इतर सदस्यांचे कालपासून जगणे मुश्किल केले आहे… कालपासून राखीने घरात धुडगूस घातला आहे. राखीच्या वागण्यामुळे विकासची घाबरगुंडी उडाली आहे… नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये राखी विकासला तिचा नवरा आहे असे सांगते आहे…राखी विकासला म्हणाली, याचं नावं राजू आहे, हा माझा नवरा आहे… राखीच्या वागणुकीला बघून किरण माने विकासला म्हणाले, तिच्या अंगात काहीतरी आलंय… राखीने विकासला विचारले, तुला माझं भयानक रूप बघायचे आहे का ? मी तुला सोडणार नाही…पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Leave a Reply

%d bloggers like this: