fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENTLatest News

रितेश – जिनिलिया च्या ‘बेसुरी’ ला प्रेक्षकांची दाद

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटाची उत्स्कुता सर्वत्र वाढली आहे . IMDB या साईट वर मोस्ट ऍंटीसिपेटेड फिल्म म्हणून पहिल्या क्रमांकावर फिल्म ट्रेंड होत आहे
‘वेड’ या सिनेमाचं पोस्टर, टीझर आणि टायटल सॉंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. आता या सिनेमातील ‘बेसुरी’ हे गाणंदेखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ‘बेसुरी’ या गाण्याच्या माध्यमातून रितेश आणि जेनेलियाने संगीतक्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्यांनी देश म्युझिक नावाने म्युझिक लेबल सुरू केलं आहे. या लेबल अंतर्गत हे पहिलं गाणं आज रिलीज करण्यात आलं आहे.

‘बेसुरी’ हे गाणं गीत वसुंधरा वी यांनी गायले आहे. तर अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. मुंबई फिल्म कंपनीने देश म्युझिक लेबलद्वारे हे गाणं रिलीज केलं आहे. ‘बेसुरी’ या रोमॅंटिक गाण्यात रितेश आणि जेनेलिया मुख्य भूमिकेत आहेत. रितेशने हे गाणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. गाण्याचा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,”आकर्षणातुन जडतं ते प्रेम आणि प्रेमातल्या वेडेपणात घडतं ते समर्पण”.

‘वेड’ या सिनेमात जेनेलिया आणि रितेशसह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री  जिया शंकरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या 30 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading